Dainik Maval News : परंदवडी (ता.मावळ) येथे महिनाभरापूर्वी आढळून आलेल्या दुर्मिळ कासवाची 22 अंडी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी रेस्क्यू करून कृत्रिमरित्या उबविण्यासाठी ठेवली होती. या अंड्यांमधून सोमवारी 20 पिल्लांनी जन्म घेतला. त्या सर्व कासवांना वन अधिकार्यांच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.
परंदवाडी येथे हरी बोल नर्सरीजवळ 7 मार्च रोजी कासवाची 22 अंडी मिळून आली होती. दिपक महाजन यांनी याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद निनाद काकडे यांना कळवली. काकडे आणि अनुभव रणपिसे यांनी अंडी ती रेस्क्यू करून कृत्रिमरित्या उबवण्यासाठी ठेवली होती.
- हे कासव वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मधील दुर्मिळ जातीचे आहे. 7 एप्रिल रोजी या अंड्यातून 20 पिल्ले बाहेर आली. दोन अंडी ही नापीक निघाली. 20 पिल्लांची प्राथमिक पाहणी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, जिगर सोलंकी, निनाद काकडे आणि वनविभाग वडगावचे वनरक्षक योगेश कोकाटे यांनी केली.
सर्व पिल्ले स्वस्थ असल्याने त्यांना वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, वनपाल एम. हिरेमठ व वनरक्ष योगेश कोकाटे यांच्या मार्फत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates