Dainik Maval News : आंबेवाडी, कान्हे (ता. मावळ) येथे एका 22 वर्षीय तरूणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवार, दिनांक 1 एप्रिल रोजी रात्री पाऊणे आठच्या सुमारास हा प्रकार समोर आला. वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे.
वैभव उमेश सातकर (वय 22, रा. आंबेवाडी, कान्हे, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अंकुश जयवंत सातकर (वय 42, रा. आंबेवाडी कान्हे, ता. मावळ) असे संशयित आरोपीचे नाव असून सध्या तो फरार असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील अधिकारी व पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वैभव सातकर व आरोपी अंकुश सातकर दोघे शेजारी राहत असून मयत वैभव सातकर याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी अंकुश सातकर यांने धारदार शस्त्राने वैभव सातकर याच्यावर वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने वैभवचा जागीच मृत्यू झाला.
अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून गेला असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते हे घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केला आहे. पुढील तपास वडगाव मावळ पोलिस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade