मावळ तालुक्यातील तुंग हे गाव आता वीज गेली किंवा अंधार पडला तरीही चोवीस तास प्रकाशित राहणार आहे. ह्याचे कारण ह्या गावात सौर उर्जेवर चालणारे पथदिवे जागोजागी बसवण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी (दिनांक 25 सप्टेंबर 2023) रोजी हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्था आणि युनिव्हर्सल शॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या मार्फत मावळमधील दुर्गम भागात असलेल्या ग्रामपंचायत तुंग इथे 25 सौरपथदिवे बसवण्यात आले.
पवन मावळ भागातील किल्ले तुंग च्या पायथ्याशी असलेले तुंग हे गाव दुर्गम भागातील गाव म्हणून ओळखले जाते. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गाव परिसरात जंगली श्वापदे, साप, विंचू आदींचा वावर असतो. अशात रात्रीच्यावेळी अंधारात घराबाहेर पडणे नागरिकांसाठी धोकदायक आणि जीवावर बेतणार असते. त्यामुळे गावकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन गावात सौरदिव्यांची सोय करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हॅन्ड इन हॅन्ड आणि युनिव्हर्सल शॅम्पो यांसह ग्रामपंचायत तुंग यांच्या माध्यमातून गावात 25 ठिकाणी बसवण्यात आलेल्या सौर दिव्यांमुळे गावात वीज गेली किंवा अंधार पडला तरीही सौर दिव्यांमुळे पायवाटा उजाळणार आहेत. नागरिकांना यामुळे सुरक्षितपणे बिनदिक्कत घराबाहेर पडता येणार आहे. हे पथदिवे बसवण्यासाठी ग्रामपंचायतीचे आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. सदर उपक्रमामुळे शाश्वत उर्जा उपायांच्या दिशेने गावाने एक पाऊलही टाकले आहे. ( 25 solar street lights have been installed in Tung village of Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– राष्ट्रवादीच्या ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्षपदी वडगाव मावळ येथील अतुल राऊत यांची निवड; शरद पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र
– तळेगावच्या प्रथमेशने सातासमुद्रापार जपली भारतीय संस्कृती; सहकाऱ्यांसोबत थाटामाटात साजरा केला गणेशोत्सव
– महाराष्ट्रात गणपती विसर्जनाला गालबोट! ठिकठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेक गणेशभक्तांचा मृत्यू, जखमींची संख्याही अधिक