व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावच्या प्रथमेशने सातासमुद्रापार जपली भारतीय संस्कृती; सहकाऱ्यांसोबत थाटामाटात साजरा केला गणेशोत्सव

तळेगाव दाभाडे शहरातील विलास हिंगे यांचा मुलगा प्रथमेश हा नोकरीनिमित्त युरोपमधील स्लोव्हाकीया या देशात स्थायिक आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 28, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
prathmesh-hinge-talegaon-Slovakia

Photo Courtesy : Vilas Hinge Talegaon


गणेशोत्सव हा प्रत्येकालाच हवाहवासा वाटणारा सण. गणेश बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा हा उत्सव असा काय साजरा केला जातो की लहानपणापासूनच गणेशोत्सवाची आवड अपोआप निर्माण होते. अशात तारूण्यात शिक्षण अथवा कामानिमित्त गाव, राज्य किंवा देश सोडावा लागल्यानंतर गणेश उत्सवाची ओढ लागू लागते. ( Prathamesh Hinge from Talegaon Dabhade celebrated Ganesh Utsav 2023 in Slovakia Country Europe )

तळेगाव दाभाडेचा सुपुत्र प्रथमेश हिंगे याने मात्र परदेशात स्थायिक झाल्यावर तिथेही गणेश बाप्पाचा उत्सव अगदी थाटामाटात साजरा करत आपली गणेशभक्ती खंडित होऊ दिलेली नाही. इतकेच नाही तर कंपनीतील सहकारी, सवंगडी यांना सोबत घेऊन पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करत भारतीय संस्कृतीची जपवणूक केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगावमधील विलास हिंगे यांचा मुलगा प्रथमेश हा नोकरीनिमित्त युरोपमधील स्लोव्हाकीया या देशात स्थायिक आहे. तिथे त्याने मित्रांसोबत गणेशोत्सव साजरा केला आहे. प्रथमेश हा एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे, त्यामुळे तो स्लोव्हाकीया देशातच राहतो. लहानपणापासून गणेश उत्सवामध्ये सहभागी होणारा प्रथमेश तळेगाव शहरातील मानाचा पहिला गणपती असणाऱ्या डोळसनाथ तालीम मंडळाचा सक्रीय सभासद होता. त्यामुळे येथील भारतीय संस्कृती परदेशातही जपत प्रथमेशने युरोपमध्ये भारतीय युवकांना बरोबर घेून 5 दिवसांचा गणेश उत्सव साजरा केला.

ह्यात दोन्ही वेळची आरती, प्रसाद आणि विसर्जनावेळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. ह्या उत्सवात तेथील भारतीय युवक, कंपनीतील सहकारी मोठ्या भक्तीभावनेने सहभागी झाले होते. यापुढेही आपली भारतीय संस्कृती परदेशात रुजवण्याचा आणि जपण्याचा मानस प्रथमेशने बोलून दाखवला. प्रथमेशचे वडील विलास हिंगे (तळेगाव दाभाडे) यांनी दैनिक मावळला ही माहिती दिली. ( Prathamesh Hinge from Talegaon Dabhade celebrated Ganesh Utsav 2023 in Slovakia Country Europe )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया
– तळेगाव दाभाडे इथे राजे उमाजी नाईक यांची 232वी जयंती उत्साहात साजरी; आप्पासाहेब चव्हाण यांची उपस्थिती
– सुट्ट्याच सुट्ट्या…! गुरुवार ते सोमवार अशा आहेत सुट्ट्या, सरकारी कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांची पर्वणी


Previous Post

महाराष्ट्रात गणपती विसर्जनाला गालबोट! ठिकठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेक गणेशभक्तांचा मृत्यू, जखमींची संख्याही अधिक

Next Post

राष्ट्रवादीच्या ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्षपदी वडगाव मावळ येथील अतुल राऊत यांची निवड; शरद पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
NCP-Atul-Raut-Pune

राष्ट्रवादीच्या ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्षपदी वडगाव मावळ येथील अतुल राऊत यांची निवड; शरद पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
Uday Samant

मोठी बातमी ! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर

May 7, 2026
Students will get opportunity to visit NASA and ISRO Maharashtra Govt approves Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari initiative

विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.