राजे उमाजी नाईक यांची 232 वी जयंती तळेगाव दाभाडे शहरात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची दिनांक 7 सप्टेंबर रोजी जयंती असते. तळेगाव या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष आप्पा साहेब चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते. ( 232 Birth Anniversary of Raje Umaji Naik Was Celebrated With Enthusiasm At Talegaon Dabhade )
तसेच राज्य संघटनेचे सचिव सुनील जाधव, तळेगाव नगर अध्यक्ष चित्रा जगनाडे, मावळ तालुका अध्यक्ष भाऊ चव्हाण, उपाध्यक्ष बाळासाहेब गुडगुल, सचिव शाम लांडगे, कृषी समिती मावळ अध्यक्ष नथु वाघमारे, हभप मुरलीधर लांडगे, सदस्य महाराष्ट्र राज्य राम नाईक, तसेच संघटक सचिन भंडलकर, सचिन चव्हाण, लक्ष्मण चव्हाण यासह तसेच तळेगावच्या नगरसेविका शोभा परदेशी, संघटना संपर्क प्रमुख तुषार मंडले, सुशील चुकाटे, रवी माकर आदी जण उपस्थित होते. यंदा पहिल्यांदाच मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली, अशी माहिती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना मावळ तालुका यांच्याकडून देण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हेही वाचा – मावळ तालुक्यात प्रथमच गावोगावी मोठ्या प्रमाणात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
मावळ तालुक्यात गावोगावी राजे उमाजी नाईक जयंती साजरी
उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 ला पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर भिवडी येथे झाला. दरवर्षी 7 सप्टेंबर रोजी भिवडी इथे मोठ्या जल्लोषात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी होते, परंतू मावळ तालुक्यात शासकीय स्तरावर काहीच कार्यालयांमध्येच ही जयंती साजरी होती. असे न होता तालुक्यांतील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये आणि शाळांमध्ये उमाजी नाईक यांची जयंती साजरी व्हावी, याकरिता तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. यानंतर निवेदनाचे परिणामस्वरुप तालुक्यातील अनेक गावांत उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– प्रख्यात साहित्यिक शरद गोरे यांना विधान परिषदेवर संधी द्या! मावळमधील 1 हजार नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी
– Breaking! शुक्रवारी शासकीय सुटी जाहीर, राज्य शासनाचा निर्णय
– तळेगावमध्ये श्रीगणेश मूर्ती दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 350 गणेशमूर्तींचे संकलन