अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी (दिनांक 28 सप्टेंबर) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार 29 तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ( Ganesh Visarjan and Eid E Milad On Same Day Government Holiday Announced By Maharashtra Govt )
ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून 29 तारखेला सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी 28 ऐवजी 29 सप्टेंबर रोजी जाहीर – शासन निर्णय वाचण्यासाठी इथे क्लिक करा
https://x.com/InfoDivPune/status/1706996621316395405?s=20
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत मावळकन्येचे सुवर्णयश! विभागीय स्पर्धेसाठी निवड
– भारत राष्ट्र समिती पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी संतोष दळवी यांची निवड जाहीर
– ‘पोरी जरा जपून’ व्याख्यानाला उदंड प्रतिसाद; विद्यार्थीनी आणि महिला-भगिनींची लक्षणीय उपस्थिती । Pavananagar