भारत राष्ट्र समिती पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी संतोष दळवी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार (दिनांक 26 सप्टेंबर) रोजी पुण्यातील हॉटेल मल्टी स्पाइस मध्ये भारत राष्ट्र समिती पक्षाची पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांची मीटिंग पार पडली. यावेळी पुणे जिल्हा प्रभारी बाळासाहेब सानप, फिरोज पटेल, संतोष हंबर्डे, पुणे जिल्हा समन्वयक राहुल काळभोर यांनी संतोष दळवी यांची भारत राष्ट्र समिती पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी निवड जाहीर केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संतोष दळवी यांनी मनोगत व्यक्त करताना येत्या काळात जनतेच्या प्रश्नांवर तालुक्यात आवाज उठवणार असल्याचे सांगितले. तसेच पक्ष संघटना मजबूत करून येणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणुका पक्ष तालुक्यात स्वबळावर लढवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मनोहर पाटील, माजी जि. प. सदस्य भाई भरत मोरे, भाऊसाहेब तुपे, अतुल येवले, भारत पवळे, अरविंद कांबळे, प्रफुल्लताई मोतलिंग, संजय कोंडे इत्यादी उपस्थित होते. ( Santosh Dalvi Appointed as Maval Taluka President of Bharat Rashtra Samiti Party )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– नागाथली येथील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ! झऱ्याखाली जखमी होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज
– शेतकऱ्यांनी तत्काळ ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन, ‘ही’ आहे अंतिम तारिख
– घरगुती गौरी सजावट स्पर्धेत सुप्रिया चौधरी प्रथम । Talegaon Dabhade