खरीप हंगाम 2023 मध्ये मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने तसेच पूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना व नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपद्वारे 15 ऑक्टोबर पर्यंत ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ( appeal to farmers to get e peek pahani done immediately )
शेतातील पिकांची माहिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने ई-पीक पाहणीचा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अर्थात पिकाची सातबारा उताऱ्यावर नोंद करणे सोपे झाले आहे. शेतकऱ्यांना मोबाइल अॅपवर शेतातील पिकांची नोंदणी करता येणार आहे. आत्तापर्यंत खरीपात पेरणी झालेल्या एकूण क्षेत्राची नोंद होणे अपेक्षित असून असताना मोठ्या प्रमाणात ई-पीक पाहणी करणे प्रलंबित आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास व ई-पीक पाहणीची नोंद असल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अचूक व लवकर मिळते. पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभागामुळे कृषी पतपुरवठा सुलभ होतो. पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होत असून अॅपवर नोंद असल्यास सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण येत नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी कळविले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– साहेब…एखादा पुर्णवेळ माणूस द्या!! ‘6 महिने झाले ग्रामविकास अधिकारी नाही..’, खडकाळे ग्रामस्थांच्या उपोषणाची जिल्ह्यात चर्चा
– माळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पल्लवी मराठे बिनविरोध । Maval Politics
– पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये आयुष्मान भव: अभियानांतर्गत आरोग्य मेळाव्यांचे आयोजन