गावचा कारभार पाहणाऱ्या सरपंचाच्या मदतीला असणारा सरकारी अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी. ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत आणि सरकार यांच्याचील दुवा. ग्रामसेवकाच्या माध्यमातूनच नागरिकांना जन्म दाखल्यापासून ते मृत्यू दाखल्यापर्यंत सर्व महत्वाची कागदपत्रे मिळत असतात. परंतू एखाद्या ग्रामपंचायतीला ग्रामसेवकच नसेल किंवा कधी तरी ग्रामसेवक हजेरी लावत असेल, तर त्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा होत असेल, याची कल्पना गावखेड्यात राहणारे नागरिकच चांगल्या प्रकारे करु शकतात. ( Khadkale Khamshet Kamshet Gram Panchayat Villagers On Hunger Strike To Get Full Time Village Development Officer )
मावळ तालुक्यातील खडकाळे खामशेत ग्रुप ग्रामपंचायतचे ( कामशेत ) ग्रामस्थ सरपंच यांनी ग्रामपंचायतीला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळावा यासाठी थेट उपोषणाचे हत्यार उगारले आहे. मागील सहा महिन्यांपासून गावाला पुर्णवेळ ग्रामसेवक नाही, त्यामुळे गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील बहुतांष ग्रामस्थ ह्यांनी थेट पंचायत समिती मावळ कार्यालयाच्या चौकात मंडप टाकून लाक्षणिक उपोषण पुकारले आहे. ग्रामपंचायत खडकाळा – खामशेत ही मावळ तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत आहे. एक निमशहरी भाग बनलेल्या या गावाला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी असणे आवश्यक आहे, मात्र गावाला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याची तक्रार येथील ग्रामस्थ आणि सरपंच – उपसरपंच यांची आहे.
गावाला पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी असावा यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला, तरीही पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी उपलब्ध झाला नाही. गावातील अनेक कामे, कागदपत्रे मिळवणे यासाठी नागरिकांना खेटे मारावे लागतात. विद्यार्थी, सामान्य नागरिक यांची यात ससेहोलपट होते, असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे. नाईलाजास्तव आम्हाला उपोषणाचे हत्यार उगारावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील अनेक गावांची हीच ओरड आहे. ग्रामसेवक हा प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी अत्यंत महत्वाचा माणूस, परंतू तालुक्यातील अनेक ठिकाणी चार-चार पाच-पाच गावांना मिळून एक ग्रामसेवक आहेत. अशात ह्या ग्रामसेवक मंडळींकडून कुठल्याही एका गावावर योग्य प्रकारे लक्ष केंद्रीत होताना किंवा सहकार्य होताना दिसत नाही. आज मी ह्या गावात आहे तुम्हाला उद्या भेटतो, उद्या मी पंचायत समितीला आहे, तुम्हाला परवा भेटतो, अशी कारणे सांगणे ह्यामुळे ग्रामसेवक मंडळींना सोपे जाते. त्यामुळे खडकाळा खामशेत ग्रामपंचायतीच्या उपोषणातून मार्ग काढत असताना संपूर्ण तालुक्यातील परिस्थिती विचारात घेऊन प्रशासन निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगाव मावळ येथील लोकन्यायालयात तब्बल 8 कोटी 27 लाखांची वसुली; 4 हजार 611 प्रकरणे निकाली
– मावळ भाजपात खांदेपालट, तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय गुंड यांची निवड, रविंद्र भेगडे पदावरुन पायउतार
– आढे गावाजवळ पवना नदीत वाहून गेला नागरिक; 48 तासानंतर मिळाला मृतदेह