मावळ तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी पल्लवी रोहिदास मराठे यांची निवड झाली आहे. मावळत्या उपसरपंच रेश्मा किशोर दाभाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी पल्लवी मराठे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. ( Pallavi Marathe Elected unopposed Deputy Sarpanch Of Malwadi Gram Panchayat )
सरपंच पल्लवी दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी जी.एस.खोमणे यांनी काम पाहिले. उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर बोलताना पल्लवी मराठे यांनी, सरपंच व ग्राम श्रेष्ठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकारी सदस्यांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने पल्लवी मराठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बजरंग दाभाडे, भिमाजी दाभाडे, गोरख दाभाडे, रोहिदास म्हस्के व बाळासाहेब भोंगाडे आदींनी मनोगत व्यक्त केले. सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच दत्तात्रेय दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, बबनराव आल्हाट, सुदाम माळी, शिवाजी दाभाडे आदी मान्यवर आणि ग्रासमस्थ यावेळी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ भाजपात खांदेपालट, तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय गुंड यांची निवड, रविंद्र भेगडे पदावरुन पायउतार
– आढे गावाजवळ पवना नदीत वाहून गेला नागरिक; 48 तासानंतर मिळाला मृतदेह
– खुशखबर! गणेशोत्सवात सहा दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी, वाचा नवीन आदेश