इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे यंदा घरगुती गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 42 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. खास बाब म्हणजे यात सोलापूर आणि रत्नागिरीच्या दोन स्पर्धकांनी व्हिडिओद्वारे सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांनी अत्यंत सुंदर, कलात्मक असे पर्यावरण पूरक देखावे तयार केले होते. यात सुप्रिया चौधरी यांना सजावटीचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. ( Gauri Ganapati decoration competition was conducted by Innerwheel Club of Talegaon Dabhade )
विजेत्यांची नावे आणि सजावट
सुप्रिया चौधरी – प्रथम क्रमांक – चांद्रयान सजावट
संतोषी शिंदे – द्वितीय क्रमांक
अश्विनी चौधरी – तृतीय क्रमांक – केदारनाथ
उत्तेजनार्थ बक्षिस
लिना जाधव
काव्या दवणी
यात इनरव्हीलच्या सभासदांमध्ये निशा पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर संगिता जाधव यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
इनरव्हीलच्या प्रकल्प प्रमुख अर्चना देशमुख, अल्पना हुंडारे आणि वैभवी पवार यांनी या स्पर्धेची जोरदार जाहिरात करून स्पर्धकांना स्पर्धेसाठी आकर्षित केले. इनरव्हीलच्या माजी अध्यक्षा भारती शहा आणि सदस्या ममता मराठे यांनी परीक्षक म्हणून उत्तम काम केले. दिनांक 22 आणि 23 सप्टेंबरला प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्यक्षात परिक्षण करताना पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर, कल्पकता, सौंदर्य दृष्टी हे निकष वापरले. स्वतः अध्यक्षा संध्या थोरात, सचिव निशा पवार, वैभवी पवार, अर्चना देशमुख, संगीता शेडे यांनीही सहकार्य केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये आयुष्मान भव: अभियानांतर्गत आरोग्य मेळाव्यांचे आयोजन
– वडगाव मावळ येथील लोकन्यायालयात तब्बल 8 कोटी 27 लाखांची वसुली; 4 हजार 611 प्रकरणे निकाली
– मावळ भाजपात खांदेपालट, तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय गुंड यांची निवड, रविंद्र भेगडे पदावरुन पायउतार