राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांची नव्याने निवड होणार असल्याची चर्चा सध्या वेग घेत आहे. साहित्य, कला, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांची शिफारस सरकार राज्यपालांकडे करत असते. त्यामुळे साहित्य क्षेत्रातून प्रसिध्द साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे.
राजकीय पर्यावसन म्हणून कुणाचीही वर्णी लावू नये अशी, अपेक्षा सबनीस यांनी व्यक्त केली आहे. सबनीस यांच्या मागणीच्या समर्थनार्थ मावळ तालुक्यातून सुमारे 1003 साहित्यिक व साहित्यप्रेमींनी मावळ तहसिलदार यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मावळ तालुका अध्यक्ष विठ्ठल दळवी यांनी शिष्ठमंडळाद्वारे महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल यांच्याकडे ही मागणी केली. ( Appoint Literary Sharad Gore As An MLA On Legislative Council Of Maharashtra Letter To Maval Tehsildar )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. साहित्यिकांसह एवढ्या मोठ्या संख्येने एखाद्या व्यक्तीला पाठिंबा मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.
शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 1993 साली त्यांनी साहित्य परिषदेची स्थापना केली. साहित्य परिषदेचे 20 हजार सभासद असून आजवर संस्थेने 150 हून अधिक साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे. त्यांनी महाराष्ट्रासह महाराष्ट्र बाहेर देखील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संमेलने घेतलेली आहेत.
नवोदित मराठी साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन, महात्मा फुले साहित्य संमेलन, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, बेळगाव मराठी साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी आदी संमेलनांचा यामध्ये समावेश आहे. साहित्यिक शरद गोरे यांनी एकूण 10 ग्रंथाचे आजवर लेखन केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी मराठी भाषेत काव्य भाषांतरित केला आहे. युगंधर प्रकाशन या संस्थेचे ते संपादक व प्रकाशक आहेत. या संस्थेने आजवर 144 दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यांनी लेखक, दिग्दर्शक व संगीतकार म्हणून 5 चित्रपट व एक नाटक केले आहे. ज्यामध्ये रणांगण एक संघर्ष, उषःकाल, प्रेमरंग, एक प्रेरणादायी प्रवास सूर्या ऐतवी, फुल टू हंगामा आदी चित्रपटांचा समावेश आहे. उत्तम शिवव्याखाते म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. आजवर विविध विषयांवर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मावळ तालुका अध्यक्ष विठ्ठल दळवी यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मावळातील गावांचा विचार केल्याशिवाय तालुक्यातील धरणांमधील पाण्याबाबत परस्पर निर्णय घेऊ नये’ – आमदार सुनिल शेळके
– जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत मावळकन्येचे सुवर्णयश! विभागीय स्पर्धेसाठी निवड
– भारत राष्ट्र समिती पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी संतोष दळवी यांची निवड जाहीर