गणेशोत्सव हा अबालवृद्धांसह सर्वांनाच हवाहवासा वाटणारा सण. हा सण अधिक आनंददायी बनतो ते मिरवणूका, वाद्य वादन आणि गावोगावी असलेल्या प्रथापरंपरा यांतून. मावळ तालुक्यातही गणेशोत्सवाची गावोगावी धामधुम पाहायला मिळते. मावळ तालुक्यातील सुदवडी गावात साई सृष्टी नगर इथे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गणेशमंडळांकडून स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ( Organized competitions for Ganesha devotees in Sudavadi village through MLA Sunil Shelke )
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून सुदवडी प्रभाग क्रमांक 1 साई सृष्टी नगर इथे विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या आणि बक्षिसांचे वाटप करण्यात आले. लहान मुलांसाठी स्लो सायकल रेस, लिंबू चमचा स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुर्ची अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत सहभागी झालेले आणि विजेते यांना बक्षीस वाटप करण्यात आली. सर्व लहान मुलांनी आणि महिला भगिनींनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक राजगुरू यांनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– तळेगावमध्ये श्रीगणेश मूर्ती दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 350 गणेशमूर्तींचे संकलन
– ‘मावळातील गावांचा विचार केल्याशिवाय तालुक्यातील धरणांमधील पाण्याबाबत परस्पर निर्णय घेऊ नये’ – आमदार सुनिल शेळके
– जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत मावळकन्येचे सुवर्णयश! विभागीय स्पर्धेसाठी निवड