मावळ तालुक्यातील (Maval Taluka) फांगणे गावाजवळ पवना धरण (Pavana Dam) जलाशयात बुडून एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू (Youth Died) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज, रविवार (दि. 25) रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास ही घटना घडली. मयंक अखिलेश उपाध्याय (वय 25) असे सदर मृत तरुणाचे नाव आहे. तो मुळ पानिपत (रा. हरियाणा) येथील रहिवासी असून सध्या हिंजवडी मध्ये एका खासगी कंपनीत काम करत होता. रविवारी मित्रांसमवेत पवना धरण भागात फिरायला आल्यानंतर हा प्रकार घडला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक हा त्याच्या इतर चार पाच मित्रांसमवेत पवना धरण भागात फिरायला आला होता. त्यावेळी पवना धरणाच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी 5 मित्रमैत्रिणी पाण्यात उतरले. तेव्हा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने इंजिनिअर असलेल्या मयंक अखिलेश उपाध्याय याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ( 25 year old engineer youth from hinjewadi drowned in pavana dam )
मयंक पाण्यात गटांगळ्या खात असताना त्याच्या सोबतच्या मित्रमैत्रिणींनी आरडोओरडा केल्याने आजूबाजूचे गावकरी गोळा झाले, त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांना यश आले नाही. अखेर 1.30 वाजता त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. एव्हाना लोणावळा ग्रामीणचे पोलिस अधिकारी विजय गाले, जय पवार हेही घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या मयंकचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खंडाळा येथे नेण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम! रोटरी क्लबच्या माध्यमातून दोन शाळांमध्ये बांधले जाणार अत्याधुनिक स्वच्छतागृह, भूमिपूजन संपन्न । Talegaon Dabhade
– महाराष्ट्रातील ‘या’ सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड; पाहा नवनिर्वाचित 6 खासदारांची नावे । Rajya Sabha Election 2024
– वडगावमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक; ‘मावळात दीड लाखाच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणू’ – आमदार सुनिल शेळके