महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेच पुणे जिल्ह्यात अवैध दारु विक्रीप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने 284 गुन्हे नोंदवून त्यातील 242 आरोपींना अटक केली. तसेच 1 कोटी 19 लाख 51 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण तसेच विभागीय उपायुक्त मोहन वर्दे यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ( 284 cases have been registered in connection with sale of illegal liquor In Pune district )
दिनांक 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान ही कारवाई मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील सासवड, तळेगाव दाभाडे, दौंड यांसह अन्य भागांमध्ये अवैधरित्या परवाना नसताना देशी तसेच परदेशी दारुची विक्री करत असल्याचे छाप्यात आढळले. त्यानुसार दारु जप्त करण्यात येऊन संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
‘मोहिमेत 15 हजार 472 लीटर गावठी दारू तसेच 471 लिटर बिअर, ताडी आणि परराज्यातील दारुसह दारु निर्मितीचे रसायनही जप्त करण्यात आले आहे. एकूण 1 कोटी 19 लाख 51 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ‘काही विक्रेते वारंवार अवैध दारु विक्री करत असल्याचे आढळल्याने महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 कलम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर पुन्हा गुन्हे करत होते. त्यांवर महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी’ (एमपीडीए) या कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव देण्यात येणार आहे,’ असे उत्पादन शुल्काचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे जिल्ह्यात 12 कार्यक्षेत्रीय पथके, दोन भरारी पथके आणि दोन विशेष पथकांसह एकूण सोळा पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. या पुढेही अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री तसेच अंमली पदार्थ विरुद्ध नियमित कारवाई सुरु राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, व विक्री तसेच अंमली पदार्थाबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी 18002339999 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी केले.
अधिक वाचा –
– महाराष्ट्र सरकारची मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’, मुलींना करणार लखपती! वाचा काय आहे योजना?
– कामशेतमध्ये मतदार नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दिवसांत 679 नवीन मतदार नोंदणी
– दिलासादायक बातमी! जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांसाठी उद्याचा दिवस ठरणार निर्णायक? वाचा सविस्तर