व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यात अवैध दारू विक्रीप्रकरणी 284 गुन्ह्यांची नोंद, 242 आरोपी अटकेत तर 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेच पुणे जिल्ह्यात अवैध दारु विक्रीप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने 284 गुन्हे नोंदवून त्यातील 242 आरोपींना अटक केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 11, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेच पुणे जिल्ह्यात अवैध दारु विक्रीप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने 284 गुन्हे नोंदवून त्यातील 242 आरोपींना अटक केली. तसेच 1 कोटी 19 लाख 51 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण तसेच विभागीय उपायुक्त मोहन वर्दे यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ( 284 cases have been registered in connection with sale of illegal liquor In Pune district )

दिनांक 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान ही कारवाई मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील सासवड, तळेगाव दाभाडे, दौंड यांसह अन्य भागांमध्ये अवैधरित्या परवाना नसताना देशी तसेच परदेशी दारुची विक्री करत असल्याचे छाप्यात आढळले. त्यानुसार दारु जप्त करण्यात येऊन संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

‘मोहिमेत 15 हजार 472 लीटर गावठी दारू तसेच 471 लिटर बिअर, ताडी आणि परराज्यातील दारुसह दारु निर्मितीचे रसायनही जप्त करण्यात आले आहे. एकूण 1 कोटी 19 लाख 51 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ‘काही विक्रेते वारंवार अवैध दारु विक्री करत असल्याचे आढळल्याने महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 कलम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर पुन्हा गुन्हे करत होते. त्यांवर महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी’ (एमपीडीए) या कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव देण्यात येणार आहे,’ असे उत्पादन शुल्काचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे जिल्ह्यात 12 कार्यक्षेत्रीय पथके, दोन भरारी पथके आणि दोन विशेष पथकांसह एकूण सोळा पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. या पुढेही अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री तसेच अंमली पदार्थ विरुद्ध नियमित कारवाई सुरु राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, व विक्री तसेच अंमली पदार्थाबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी 18002339999 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी केले.

अधिक वाचा –
– महाराष्ट्र सरकारची मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’, मुलींना करणार लखपती! वाचा काय आहे योजना?
– कामशेतमध्ये मतदार नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दिवसांत 679 नवीन मतदार नोंदणी
– दिलासादायक बातमी! जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांसाठी उद्याचा दिवस ठरणार निर्णायक? वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

तुंग गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना 1100 केशर आंब्याची रोपे वाटप

Next Post

आपत्कालीन सेवा बजावणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सना लायन्स क्लबने दिले विमा कवच । Khopoli News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lions-Club-Khopoli

आपत्कालीन सेवा बजावणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सना लायन्स क्लबने दिले विमा कवच । Khopoli News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.