गेल्या काही वर्षांमध्ये अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. जिल्ह्यात अनधिकृत शाळांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या दरम्यान काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची एक यादी समोर आली असून शहर आणि जिल्ह्यात मिळून एकूण 49 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या 49 शाळांमध्ये मावळ तालुक्यातील 4 शाळांचा समावेश आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी –
किड्जी स्कूल दौंड, जिजाऊ एज्युकेशन सोसायटीचे अभंग शिशू विकास कासुर्डी, ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल उंड्री, नारायण ई टेक्नो स्कूल वाघोली, द गोल्डन इरा इंग्लिश मीडियम स्कूल हवेली, फ्लोरिंग फ्लोरा इंग्लिश मीडियम स्कूल मांजरी बु., इ. एम. एच. इंग्लिश मीडियम स्कूल फुरसुंगी, व्हीटीईएल इंग्लिश मीडियम स्कूल भेकराईनगर, द टायगर इज इंटरनॅशनल स्कूल कदमवाकवस्ती, रामदास सिटी स्कूल रामदरा, मारीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल कदमवाकवस्ती, श्रीमती सुलोचनाबाई झेंडे बालविकास मंदिर व प्राथमिक विद्यालय कुंजीरवाडी, शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल जांभुळवाडी, भैरवनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मोई, जिजस क्राइस्ट इंग्लिश मीडियम स्कूल कामशेत, श्रेयान इंटरनॅशनल स्कूल गहुंजे, व्यंकेश्वरा वर्ल्ड स्कूल नायगाव, किंग्ज वे पब्लिक स्कूल रायवूड लोणावळा, रुडिमेन्ट इंटरनॅशनल स्कूल माण, एंजल इंग्लिश मीडियम स्कूल नेरे, चाणक्य कनिष्ठ महाविद्यालय पिरंगुट, महिंद्रा युनायटेड इंटरनॅशनल स्कूल खुबवली, अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल मुळशी, पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगुट, ईलाइट इंटरनॅशनल स्कूल मुळशी, संस्कार प्रायमरी स्कूल इंग्लिश मीडियम मुळशी, श्री विद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल घोटावडे फाटा, पोदार इंटरनॅशनल स्कूल ताथवडे, एलप्रो इंटरनॅशनल स्कूल हिंजवडी, माऊंट कासल इंग्लिश मीडियम स्कूल नेरे, सरस्वती विद्या मंदिर पिरंगुट, श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर, तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब कोंढवा, लेगसी हायस्कूल कोंढवा, इमॅन्युअल पब्लिक स्कूल हडपसर, पिपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट पिंपळे निलख, श्री चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे निलख, आयडियल इंग्लिश स्कूल पिंपळे गुरव, सपलिंग्स इंग्लिश मीडियम स्कूल चिंचवडेनगर, लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चिंचवडेनगर, नवजित विद्यालय वाल्हेकरवाडी, किड्सजी स्कूल पिंपळे सौदागर, एम. एस. स्कूल फॉर किड्स सांगवी, क्रिस्टल मॉर्डन स्कूल चऱ्होली, माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल कासारवाडी, ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल चिंचवड.
मावळ तालुक्यातील अनधिकृत शाळांची यादी –
मावळ तालुक्यातील 4 शाळा या अनधिकृत असल्याचे तपासणीत समोर आले आहे. यात कामशेत परिसरात दोन शाळा, एक लोणावळा आणि एक गहुंजे येथे आहे. ( 49 schools are unauthorized in Pune district 4 schools are unauthorized in Maval taluka see list )
1.जिजस क्राइस्ट इंग्लिश मीडियम स्कूल कामशेत,
2.व्यंकटेश्वरा वर्ल्ड स्कूल नायगाव,
3.किंग्ज वे पब्लिक स्कूल रायवूड लोणावळा आणि
4.श्रेयान इंटरनॅशनल स्कूल गहुंजे
तालुक्यातील या चार शाळा अनधिकृत असल्याचे तपासणीत आढळून आले आहे.
शिक्षण विभागाला या शाळा अनधिकृत आहेत, हे माहिती आहे. मग ते यावर थेट कारवाई का करत नाही. शाळेच्या एवढ्या मोठ्या इमारती बांधण्यात आल्या,, जर परवानगी नव्हती तर इमारती कशा बांधल्या, यात कुणाचे हितसंबंध आहेत का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सोबत शासन मान्यता नसल्याने सदर शाळा अनधिकृत असतात आणि शाळाच अनधिकृत असल्याने तेथील विद्यार्थ्यांची शासकीय नोंद नसते. सोबत विद्यार्थ्यांचा युडायस नंबर देखील नसतो. एकप्रकारे विद्यार्थी देखील विद्यार्थी म्हणून अनधिकृत ठरतात. यामुळे पालकही चिंतेत आहेत.
अधिक वाचा –
– शेतकरी उत्पादक संघ आणि कंपन्यांना गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन – वाचा सविस्तर
– कुंडमळा येथे पर्यटनासाठी येताय ? मग हे नियम वाचून घ्या, धोकादायक पर्यटन न करण्याचे आवाहन । Indori Kundamala Waterfalls
– शाब्बास पोरी ! सानिया गपचुप हिची पदव्युत्तर शिक्षणासाठी न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये निवड ; बाळा भेगडे यांच्याकडून सन्मान