व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुंडमळा येथे पर्यटनासाठी येताय ? मग हे नियम वाचून घ्या, धोकादायक पर्यटन न करण्याचे आवाहन । Indori Kundamala Waterfalls

जुलैच्या मध्यात जोरदार पाऊस कोसळत असून त्यामुळे मावळ तालुक्यातील विविध पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 14, 2024
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Talegaon Dabhadae Indori Kundamala Waterfalls

Photo Courtesy : IG/puneriguide


Indori Kundamala Waterfalls : जून महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. जुलैच्या मध्यात जोरदार पाऊस कोसळत असून त्यामुळे मावळ तालुक्यातील विविध पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. मावळ तालुका हा पर्यटनाचा तालुका म्हणून संपूर्ण राज्याला परिचित आहे. त्यातही मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणचे पर्यटक जवळचा पर्याय म्हणून मावळ तालुक्याला पसंती देतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यातही लोणावळा, खंडाळा, कार्ला, पवना, गडकिल्ले ही पर्यटकांची पसंतीची ठिकाणे आहेत. या सगळ्यात इंदोरी जवळील कुंडमळा हे ठिकाणही पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असून येथील रांजणखळगे आणि पाण्याच्या प्रवाहाचे दृश्य पाहायला मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. ( talegaon dabhade indori kundmala waterfalls tourist spot regulations for tourists )

प्रत्येक पावसाळ्यात बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ शेलारवाडी येथील कुंडमळा हे ठिकाण पर्यटकांनी फुलून जाते. येथील कुंड मातेचे मंदीर, रांजणखळगे, बंधाऱ्यावरून वाहनारा इंद्रायणीचा प्रवाह, लोखंडी पूल हे भाग पर्यटकांना आकर्षित करतात. निसर्गाचा हा नजारा पाहणे आणि नयनरम्य निसर्ग ठिकाणाचा आनंद घेणे यासाठी हजारो पर्यटक येथे येतात. आताही येथे गर्दी होत आहे. परंतु येथे आल्यावर अनेकदा पर्यटक धोकादायक पर्यटन करतात आणि जिवाला मुकतात. त्यातही रांजणखळग्यांच्या जवळ उभे राहत धोकादायक सेल्फी काढण्याच्या नादात आजवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे.

अशा अपघाताचे शेकडो व्हिडिओ आजवर व्हायरल झाले आहेत. तरीही पर्यटकांना त्याचे गांभीर्य नसून दरवर्षा कोणी ना कोणी वाहून गेल्याचे वृत्त येतेत. त्यात येथील पाण्याचा विचित्र प्रवाह आणि रांजणखळगे यामुळे वाहन गेलेल्या व्यक्तीचा शोध घेणे कठीण जाते, असे आपदा मित्र तथा वन्यजीव रक्षकचे निलेश गराडे यांनी सांगितले.

यंदाच्या मोसमात अद्याप अपघात घडल्याची किंवा कोणी वाहून गेलेल्याची नोंद नाहीये. परंतू पर्यटकांनी धोकादायक पद्धतीने पर्यटन टाळावे, बंधाऱ्यावरील साकव पुलावरून येजा करू नये, वाहने पाण्यात घालू नये, पाण्याचा अंदाज नसेल तर पाण्याच उतरू नये, धोकादायक ठिकाणी उभे राहून सेल्फी काढू नये, जीव धोक्यात घालून पाण्यात उतरू नये असे आवाहन पर्यटकांना प्रशासनाने केले आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पाण्याचा प्रवाह वाढला, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी भुशी धरण बंद, पर्यटकांचा हिरमोड । Lonavala Bhushi Dam Updates
– पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस, 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 4 टक्क्यांनी वाढ, नागरिकांना सावधानतेचा इशारा
– सतर्क राहा ! लोणावळ्यात विक्रमी पाऊस, 24 तासापासून बरसतोय मुसळधार पाऊस, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

शाब्बास पोरी ! सानिया गपचुप हिची पदव्युत्तर शिक्षणासाठी न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये निवड ; बाळा भेगडे यांच्याकडून सन्मान

Next Post

शेतकरी उत्पादक संघ आणि कंपन्यांना गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन – वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Godown Warehouse construction grant Subsidy

शेतकरी उत्पादक संघ आणि कंपन्यांना गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन - वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.