व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी 6 जणांना वनकोठडी, मावळमधील एका आरोपीचा समावेश । Pune News

6 आरोपीना अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 17, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Pangolins-found

Photo Courtesy : Nilesh Garade


जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ घोडेगाव नियतक्षेत्र घोडेगाव येथे मंगळवारी (दि. 13) खवले मांजर (इंडियन पँगोलीन) या शेड्युल 1 मधील वन्यप्राण्याची तस्करी केल्या प्रकरणात 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी 6 आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

ह्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रोहीदास पंढरीनाथ कुळेकर वय 55 वर्ष, कांताराम सखाराम वाजे वय 49 वर्ष दोघे रा. भोमाळे (ता. खेड), सखाराम बबन मराडे वय 43 वर्ष, रा. पाभे (ता. खेड), सागर पुनाजी मेमाणे वय 31 वर्ष, रा. तळेराण (ता. जुन्नर), जालिंदर कान्डु कशाळे वय 65 वर्ष, रा. वडेश्वर (ता. मावळ), श्रीमती गीता नंदकुमार जगदाळे रा. चव्हाणवस्ती कुमठे (ता. कोरेगाव जि. सातारा), शांताराम सोमनाथ कुडेकर वय 32 वर्ष, रा. करंजाळे (ता. जुन्नर) असे एकूण 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी 6 आरोपीना अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे. ( 6 people in forest custody in case of scaly cat pangolins smuggling )

ही कार्यवाही पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण, जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा तथा सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर संदेश पाटील, घोडेगाव आणि खेड वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आली. वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैद्य वृक्षतोड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाचा टोल फ्री नंबर 1926 या क्रमांकावर संर्पक साधून माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहायक वनसंरक्षक पाटील यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील पिंपरी गावात मध केंद्र योजनेचा जनजागृती मेळावा संपन्न; खादी व ग्रामोद्योग मंडळाचा उपक्रम । Maval News
– श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनकडून कर्तृत्ववान व्यक्ती, संस्थांचा गौरव; ‘रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या’
– स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कुणे नामा येथील कातकरी व ठाकर समाजातील 68 नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद उत्कृष्ट महारत्न’ पुरस्कार प्रदान । Sansad Ratna Award

Next Post

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, ‘या’ लोकल गाड्या रद्द, पाहा वेळापत्रक । Mega Block on Pune Lonavala Railway Route

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-Local

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, 'या' लोकल गाड्या रद्द, पाहा वेळापत्रक । Mega Block on Pune Lonavala Railway Route

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.