व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कुणे नामा येथील कातकरी व ठाकर समाजातील 68 नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र । Maval News

आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यात आदिम सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 17, 2024
in लोकल, ग्रामीण
caste-certificate-to-Adiwasi

Photo Courtesy : Team Dainik Maval


आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यात आदिम सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. संपुर्ण तालुक्यात आमदार शेळकेंच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या आदिम सेवा अभियानांतर्गत कुणे ना.मा. येथील 68 कातकरी व ठाकर समाज बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप शनिवार (दि. 17) करण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या कुणे गावातील ठाकर व कातकरी समाजातील अनेक नागरिकांकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंरही जातीचे दाखले उपलब्ध नाहीत. शैक्षणिक कामांसाठी, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु ज्यांचे पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते, अशा कुटुंबातील नागरिकांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो व दाखला मिळत नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते. ( Distribution of caste certificate to 68 citizens of Katkari and Thakar Samaj of Kune Nama Village Maval )

आजपर्यंत विविध शिबिरे, योजनांच्या नावाखाली केवळ कागदपत्रे जमा केली जातात. परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दाखले कोणीही मिळवून देत नव्हते. त्यामुळे आश्वासनांशिवाय या नागरिकांच्या पदरात काहीच पडले नव्हते. परंतु आमदार शेळके यांनी आदिम सेवा अभियान प्रभावीपणे राबवित तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन नागरिकांच्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे व शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे यामुळे या नागरिकांना अखेर जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहेत.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जातीचे दाखले मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सागर उंबरे, सुरेश होले, अशोक गोजे, कमलबाई वाघमारे, अश्विनी वाघमारे, रामदास शेलार, माजी पंचायत समिती सदस्य महादू उघडे, अविनाश लोमटे, बाळू गोजे, हरीश तांडील, शंकर भस्मे, खंडू ठोंबरे, भागू होले, अनंता मेंगाळ, चंदर ठोंबरे, सागर गोणते, अमित शिवणेकर, यशवंत ठोंबरे, गणेश जाधव, बाळू होले व ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘डान्स मावळ डान्स’ नृत्य व चित्रकला स्पर्धेत मावळमधील युवा कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग, तब्बल 2300 स्पर्धकांची नोंद । Vadgaon Maval
– संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ‘ग्रामीण भागातील शिक्षण संस्थाचा विकास देशासाठी महत्वाचा’ – धनराज विसपुते
– ग्रामपंचायत महागाव, भोयरे आणि पिंपरी येथे शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाबद्दल मार्गदर्शन । Maval News


Previous Post

तब्बल 7 तास चालली मावळ तालुक्याची ‘आमसभा’, आमदार शेळकेंच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांच्या समस्यांची ऑन दी स्पॉट सोडवणूक

Next Post

श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनकडून कर्तृत्ववान व्यक्ती, संस्थांचा गौरव; ‘रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shrirang-barne-birthday

श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनकडून कर्तृत्ववान व्यक्ती, संस्थांचा गौरव; 'रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival 2026 Committee at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे

February 14, 2026
On occasion of Mahashivratri Akhand Harinam saptah at Shri kshetra Ghoravadeshwar Maval

महाशिवरात्री निमित्त PMPML कडून मावळातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर इथे जाण्यासाठी रविवारी विशेष बससेवा

February 14, 2026
Crime

चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू

February 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.