व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद उत्कृष्ट महारत्न’ पुरस्कार प्रदान । Sansad Ratna Award

संसदेत चांगली कामगिरी करणाऱ्या आणि लोकांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान केला जातो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 17, 2024
in देश-विदेश, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा
Sansad-Ratna-Award

Photo Courtesy : Team Dainik Maval


संसदेत चांगली कामगिरी करणाऱ्या आणि लोकांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदाच्या या पुरस्काराच्या मानकऱ्यांची यादी जाहीर झाली, ज्यात महाराष्ट्रातील पाच खासदारांचा समावेश आहे. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन खासदार, शिवसेना शिंदे गटातील दोन खासदार आणि भाजपच्या एका महिला खासदाराचा समावेश आहे. दिल्लीत आज (दि. 17) या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना यावेळी संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

संसदरत्न पुरस्काराचा इतिहास –
प्राईम पॉइंट फाउंडेशन मार्फत हा पुरस्कार दिला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आग्रहाखातर प्राइम प्वाइंट फाउंडेशनने हा पुरस्कार सुरू केला. 2010 साली या पुरस्काराचे अब्दुल कलाम यांनी उद्घाटन केले होते. दरवर्षी संसदेत आपल्या कामाची छाप पाडणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार दिला जातो. यंदा सात जानेवारीला या पुरस्कारांची घोषणा झाली होती. त्यानंतर आज (शनिवार, दि. 17) हे पुरस्कार वितरित करण्यात आले.

संसद रत्न ते संसद उत्कृष्ट महारत्न खासदार श्रीरंग बारणे –
सर्वसामान्यांचे प्रश्न हिरीरीने मांडणारे संघर्षशील व्यक्तिमत्त्व, शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांना ‘संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले संवेदनशील प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीरंग बारणे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, कृषी आणि औद्योगिक विषयासंदर्भात केलेली आजपर्यंतची अनेक भाषणं आणि लोकसभेत पाच वर्षे सातत्यपूर्ण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ( Baramati MP Supriya Sule Maval MP Srirang Barne awarded Parliament Excellence Maharatna )

अधिक वाचा –
– श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनकडून कर्तृत्ववान व्यक्ती, संस्थांचा गौरव; ‘रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या’
– स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कुणे नामा येथील कातकरी व ठाकर समाजातील 68 नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र । Maval News
– तब्बल 7 तास चालली मावळ तालुक्याची ‘आमसभा’, आमदार शेळकेंच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांच्या समस्यांची ऑन दी स्पॉट सोडवणूक


Previous Post

संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती उत्साहात साजरी, तळेगाव दाभाडे शहरात भव्य मिरवणूक । Talegaon Dabhade

Next Post

खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी 6 जणांना वनकोठडी, मावळमधील एका आरोपीचा समावेश । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pangolins-found

खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी 6 जणांना वनकोठडी, मावळमधील एका आरोपीचा समावेश । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.