व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा, राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा; खासदार बारणेंचा पाठपुरावा यशस्वी

ओबीसी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क किंवा शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकणाऱ्या 64 अभ्यासक्रमांची यादी शासन निर्णयाने जाहीर करण्यात आली होती. परंतू...

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 4, 2023
in महाराष्ट्र, पुणे, शहर
shrirang-barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


पनवेल मधील पिल्लेज महाविद्यालयातील 60 ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने नवीन विषयांचा समावेश करत सुधारित आदेश काढले आहेत. यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी यशस्वी पाठपुरावा केला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ओबीसी विभागाने हा आदेश काढला. याचा राज्यभरातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ( 60 OBC students of Pillage College in Panvel have been cleared for scholarships )

ओबीसी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क किंवा शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकणाऱ्या 64 अभ्यासक्रमांची यादी शासन निर्णयाने जाहीर करण्यात आली होती. परंतु त्या शासन निर्णयामध्ये “इलेक्ट्रॉनिक अँड कम्प्युटर इंजीनियरिंग” हेच नाव दोनदा आले. “इलेक्ट्रॉनिक अँड कम्प्युटर सायन्स” या विषयाकरता मिळणा-या शिष्यवृत्तीसाठी शासकीय अध्यादेशात नाव चुकीचे किंवा छापलेच नसल्याने विद्यार्थ्यांना मिळाली नव्हती. पनवेल मधील पिल्लेज महाविद्यालयात ही शिष्यवृत्ती मिळणार या आशेने दोन वर्षांपूर्वी प्रवेश घेतलेले तब्बल 60 विद्यार्थी या शिष्यवृत्ती पासून वंचित राहिले होते. महाविद्यालयाने शासनाशी पत्रव्यवहार करूनही काही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेरीस कॉलेजने विद्यार्थ्यांकडे लाखो रुपये फी ची मागणी करण्यास सुरुवात केली.

विद्यार्थी व पालकांनी महानगरप्रमुख माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांना हा विषय सांगितला. सोमण यांनी पुढाकार घेऊन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना या विषयाबद्दल माहिती दिली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार बारणे यांनी त्वरित विषयाचा पाठपुरावा सुरू केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतिम आदेशाने अखेरीस आता हा शासन निर्णय दुरुस्त करून पुन्हा प्रसिद्ध करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा झाला. विद्यार्थी व पालक यांना प्रचंड मोठा दिलासा मिळाला. पालकांनी शासनाचे आभार मानण्यासाठी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सुधारित शासन निर्णय आल्यानंतर आता पनवेलच नव्हे तर राज्यभरातील ओबीसींना या विशिष्ट विषयाकरता मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे खासदार बारणे म्हणाले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– धाराशिव जिल्ह्यात प्रथमच रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार! संपूर्ण वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी फायनल
– गोरक्षणात प्राण गमावलेल्या गोरक्षकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 लाख; औंध इथे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयाचे उद्घाटन
– मराठा समाजाचा निर्णय घेता येत नसेल तर सत्तेत तरी कशाला बसता?


Previous Post

जालना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरण; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Next Post

पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसमोर काढला राष्ट्रवादीच्या काळातील ‘मावळ गोळीबार’चा मुद्दा आणि…

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-firing-case

पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसमोर काढला राष्ट्रवादीच्या काळातील 'मावळ गोळीबार'चा मुद्दा आणि...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.