Dainik Maval News : मागील आठवड्यात गुरूवारी झालेल्या देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिना कार्यक्रमात उत्साही खोपोलीकरांनी 250 फूट उंचीवर 600 स्क्वेअर फूट आकाराचा तिरंगा फडकववून इतिहास रचला आहे. खोपोली शहरातील शिळफाटा परिसरातल्या इंदिरा गांधी चौकात राष्ट्रिय महामार्ग क्रमांक 48 लगत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भली मोठी टेलोस्कोपी क्रेन आलेली पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. उत्साही तरूण आणि जेष्ठ नागरिक लगबगीने तेथे वावरताना दिसत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बघता बघता गर्दी वाढत गेली आणि सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास अत्यंत शिस्तीत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरूनाथ साठेलकर यांच्या उपस्थितीत उद्योजक अश्पाक लोगडे, हिंदुस्तान क्रेनचे मालक बब्बु भाई, देवदूत विजय भोसले, अलीम भाई, चांद मेस्त्री, कलीम मेस्त्री, इर्शाद मेस्त्री, मॅक्स स्पेअर कंपनीचे मोबीन यांचे सोबत कित्येक राष्ट्रप्रेमींच्या हातभारातून टेलोस्कोपिक क्रेनच्या साहाय्याने 600 स्क्वेअर फूट आकाराचा भलामोठा तिरंगा आसमंताशी स्पर्धा करत 250 फूट उंचीवर फडकवला गेला. ( 600 square feet tricolor flag was hoisted at height of 250 feet in Khopoli City on Independence Day )
सुमधुर देशभक्तीपर गीतांच्या पार्श्भूमीवर शेकडो नागरिकांनी टाळ्या वाजवून घोषणा देत यावेळी आपला आनंद व्यक्त केला. हे अद्भुत दृष्य पाहून नकळत प्रत्येकजण प्राणप्रिय तिरंग्याला अभिवादन करत होते. आयोजकांच्या वतीने लहानथोरांना मिठाईचे वाटप केले गेले. त्यानंतर दिवसभर येणारे जाणारे नागरिक, प्रवासी, वाहनचालक क्षणभर थांबून आपापल्या मोबाईल कॅमेरामध्ये फोटो आणि सेल्फी काढून रिल्स बनवताना दिसत होते.
खोपोलीकरांनी या अभूतपूर्व आयोजनातून व्यक्त केलेले राष्ट्रप्रेम सगळ्यांच्या प्रशंसेचा आणि चर्चेचा विषय होता. कित्येकांच्या मोबाईल डी पी आणि स्टेटस् वरून या सोहळ्याचे विलोभनीय क्षण लाखो जणांच्या कौतुकाचा विषय झाले. या आयोजनाला मिळालेला उस्पूर्त प्रतिसाद पाहून भविष्यात यापेक्षाही कल्पकतेने राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचा संकल्प या निमित्ताने केला गेला.
अधिक वाचा –
– एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता सांस्कृतिक वाद्य साहित्यांची भेट । Karla News
– स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात रोटरी सिटीच्या माध्यमातून रक्षाबंधन सण साजरा । Maval News
– येळसे येथील प्राथमिक शाळेत मावळ तालुक्यातील पहिला स्किल स्कूल शाळा प्रकल्प सुरू । Pavananagar News