केंद्र व राज्य सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वच्छता पंधरावडा निमित्त महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला आयोजित ‘एक हात एक साथ स्वच्छतेसाठी’ या उपक्रमांतर्गत लोक सहभागातून वडगाव शहरात सात टन कचरा संकलित करण्यात आला. ( 7 tonnes of garbage was collected in Vadgaon city in Swachhta Hi Seva Abhiyan )
वडगाव नगरपंचायत च्या मार्गदर्शनाखाली वडगाव शहर भाजपा यांनी शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबवली यात प्रामुख्याने पंचायत समिती चौक, वडगाव रेल्वे स्टेशन, महादजी शिंदे उद्यान, शहरातील मुख्य रस्ता, महालक्ष्मी मंदिर केशवनगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवनगर या भागात स्वच्छता श्रमदान करण्यात आले.
यावेळी वडगाव नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, भाजपा वडगांव शहराध्यक्ष अनंता कुडे, माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, दिनेश ढोरे, माजी नगरसेवक प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळस्कर, किरण म्हाळस्कर, संपत म्हाळस्कर, रविंद्र काकडे, शंकर भोंडवे, माजी सरपंच संभाजी म्हाळस्कर, किरण भिलारे, दीपक भालेराव, योगेश म्हाळस्कर, शरद मोरे, अमोल ठोंबरे, अतुल म्हाळस्कर, उद्योजक गणेश भेगडे आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
माजी सभापती गुलाब म्हाळस्कर यांनी यावेळी बोलताना, ‘कचऱ्याचे वर्गीकरण करावे व कचरा गाडीतच टाकावा जेणेकरून आपला परिसर स्वच्छ राहील,’ असे आवाहन केले. तसेच महात्मा गांधी यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतल्याबद्दल सर्व नागरिक व नगरपंचायत प्रशासनाचे हार्दिक आभार मानण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मावळ तालुक्यात पावसाळ्यामुळे बंद असलेली विकासकामे लवकर सुरु करण्यात यावी’ – आमदार सुनिल शेळके
– डीजेच्या लेझर लाईटमुळे तरूणाच्या डोळ्याची दृष्टी अधू; पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीतील घटना
– ‘जे घरात बसलेत त्यांनी शहरवासीयांना उत्तर द्यावं’, तळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांवरुन ‘आण्णांचा’ ‘आप्पांवर’ हल्लाबोल