Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या मार्फत आणि लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पुढाकारातून लोणावळा उपविभागात ‘संकल्प नशामुक्ती’ अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 71 कारवाया करण्यात आल्या असून 102 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर जवळपास 2 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा उपविभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वर्षभरापूर्वी संकल्प नशामुक्ती अभियान सुरू केले होते. या अभियानाअंतर्गत लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 71 वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमधून 102 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल 1 कोटी 96 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संकल्प नशामुक्ती अंतर्गत चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मार्गदर्शन तसेच वेगवेगळ्या रॅली, मॅरेथॉन, पथनाट्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. याचा परिणाम दिसू लागला असून यातून प्रेरणा घेत जयहिंद लोकचळवळ, लोणावळा शहर पत्रकार संघ, शाळा, कॉलेजस, वेगवेगळे क्लब आणि सामाजिक संस्था या अभियानाला जोडल्या गेल्या आहेत.
अधिक वाचा –
– महिलेचा गळा आवळून मोबाईल चोरीचा प्रयत्न ; वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर घटना । Vadgaon Maval
– आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे; एससी, एसटी वर्गातील आंदोलकांचे तहसीलदारांना निवेदन । Maval News
– सोमाटणे फाटा येथे शिवसेना उबाठा पक्षाकडून बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध । Maval News