Dainik Maval News : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन गुरुवार, 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी 9.05 वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7.30 वाजता आणि शनिवार वाडा येथे सकाळी 8 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या गड किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नागरिकांना मुख्य शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी सकाळी 8.35 ते 9.35 वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा अथवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. अन्य कार्यालयांना सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 नंतर ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करता येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन समारंभात मतदानाची शपथ घेण्याचे आवाहन –
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन समारंभात मतदानाची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 1 ऑगस्ट रोजी विशेष संक्षिप्त कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार 6 ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मयत, स्थलांतरित नावे वगळणे, नावामध्ये, पत्त्यामध्ये दुरुस्ती करणे, मतदान केंद्र बदलणे आदी स्वरूपाची कामे केली जाणार आहेत.
आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्ताने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण साजरा करून उपस्थित अधिकारी- कर्मचारी तसेच नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात यावी. मतदार जागृती विशेष उपक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ( 77th Anniversary Celebration of Indian Independence Day Know Flag Hoisting Timings )
अधिक वाचा –
– तळेगावमधील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात इनरव्हील क्लबतर्फे करिअर विषयक मार्गदर्शन सत्र । Talegaon Dabhade
– हर घर तिरंगा अभियान : वडगांव नगरपंचायतीद्वारे ‘तिरंगा दौड’ मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचे आयोजन । Vadgaon Maval
– राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी 35 लाख 22 हजार महिला पात्र ; अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी ‘हे’ काम नक्की करा