व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 77 वा वर्धापन दिन समारंभ, जाणून घ्या ध्वजारोहणाची वेळ । Indian Independence Day

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन समारंभात मतदानाची शपथ घेण्याचे आवाहन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 14, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Tiranga-National-Flag-India

File Image


Dainik Maval News : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन गुरुवार, 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी 9.05 वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7.30 वाजता आणि शनिवार वाडा येथे सकाळी 8 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या गड किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

नागरिकांना मुख्य शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी सकाळी 8.35 ते 9.35 वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा अथवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. अन्य कार्यालयांना सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 नंतर ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करता येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन समारंभात मतदानाची शपथ घेण्याचे आवाहन –
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिन समारंभात मतदानाची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 1 ऑगस्ट रोजी विशेष संक्षिप्त कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार 6 ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मयत, स्थलांतरित नावे वगळणे, नावामध्ये, पत्त्यामध्ये दुरुस्ती करणे, मतदान केंद्र बदलणे आदी स्वरूपाची कामे केली जाणार आहेत.

आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्ताने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण साजरा करून उपस्थित अधिकारी- कर्मचारी तसेच नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात यावी. मतदार जागृती विशेष उपक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ( 77th Anniversary Celebration of Indian Independence Day Know Flag Hoisting Timings )

अधिक वाचा –
– तळेगावमधील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात इनरव्हील क्लबतर्फे करिअर विषयक मार्गदर्शन सत्र । Talegaon Dabhade

– हर घर तिरंगा अभियान : वडगांव नगरपंचायतीद्वारे ‘तिरंगा दौड’ मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचे आयोजन । Vadgaon Maval
– राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी 35 लाख 22 हजार महिला पात्र ; अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी ‘हे’ काम नक्की करा


Previous Post

तळेगाव दाभाडे शहरात भव्य तिरंगा रॅली, महापुरुषांच्या वेशभूषेतील बालचमूंनी वेधले सर्वांचेच लक्ष । Talegaon Dabhade

Next Post

राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची तळेगावमध्ये जय्यत तयारी ; अजित पवारांच्या उपस्थितीत साजरे होणार रक्षाबंधन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची तळेगावमध्ये जय्यत तयारी ; अजित पवारांच्या उपस्थितीत साजरे होणार रक्षाबंधन

राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची तळेगावमध्ये जय्यत तयारी ; अजित पवारांच्या उपस्थितीत साजरे होणार रक्षाबंधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.