व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval

मावळ तालुक्यातील वेगवेगळ्या भागात मागील दहा दिवसांत एकूण ९ अजगर सापांना वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थांच्या सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 21, 2025
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
9 pythons were saved from death by Wildlife Protector Maval Shivdurg Mitra snake friends Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील वेगवेगळ्या भागात मागील दहा दिवसांत एकूण ९ अजगर सापांना वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थांच्या सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.

पाऊस सुरू झाल्यापासून गेली काही दिवस साप नेहमीच्या वास्तव्याचे ठिकाण सोडून बाहेर पडत आहेत. तसेच घोणस साप देखील दृष्टीस येत आहे. वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग मित्रकडून गेल्या काही दिववसांत लोकवस्तीतून जवळपास नऊ अजगर रेस्कू करण्यात आलेत. यात काही अजगर हे ९-१० फूट लांब होते. तर एख अजगर अगदी १.५ फूट अर्थात पिल्लू होता.

रेस्कू केलेल्या अजगरांत लोणावळा परिसरात रस्ता ओलांडताना एक अजगर आढळून आला, एका सोसायटीमध्ये ४ अजगराची पिल्ले आढळून आली. तर मावळच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी अजगर रेस्कू करण्यात आले.

वनविभाग वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. पालोडकर, वनरक्षक आ. मुंडे, वनमजूर विशाल सुतार, गफूर शेख, इरफान शेख, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सचिव सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शत्रुघ्न रासनकर, अनिल आंद्रे, सुनील गायकवाड, संतोष दहिभाते, नागेश कदम, रमेश कुंभार, जिगर सोलंकी, निनाद काकडे, मनोहर ढाकोळ, गणेश कालेकर, आदिनाथ पडवळ मोरेशोर मांडेकर ह्या सर्पमित्रांनी अजगर रेस्कू करण्यात भूमिका बजावली.

  • अनेकजण घोणस सापाला अजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करतात, परंतु घोणस हा विषारी साप आहे, तर अजगर बिनविषारी. भारतीय अजगर हा बिनविषारी साप आहे, तर रसेल्स वायपर हा अतिशय विषारी साप आहे. अजगर अत्यंत संथ असतो आणि माणसाला चावण्याची शक्यता फार कमी असते. तो आपल्या शिकाराला विष न वापरता, त्याला घट्ट वेढून घुसमटवून मारतो. त्याच्या अंगाचा रंग पांढरट-तपकिरी असून शरीरावर गडद तपकिरी डाग दिसतात. त्याचा आकारही मोठा, लांबसर आणि जाडसर असतो – अनेकदा 10 ते 15 फूटांपर्यंत वाढतो.

याउलट रसेल्स वायपर (घोणस) छोट्या-मोठ्या आकाराचा असून साधारणतः 3 ते 5 फूट लांब असतो. त्याच्या अंगावर स्पष्ट ‘बदाम’ आकाराचे किंवा गोलसर डाग असतात आणि रंग पिवळसर-तपकिरी असतो. त्याचे डोके त्रिकोणी असून शरीरापासून वेगळे स्पष्टपणे दिसते. रसेल्स वायपर अतिशय चपळ साप असतो – तो धोक्याची चाहूल लागताच कुकर ची शिट्टी सारखा फुत्कारतो. त्याचा फुत्कार खूप मोठा आणि धडकी भरवणारा असतो. माणसाला चावल्यास त्याच्या विषामुळे जीवितधोका निर्माण होऊ शकतो. या दोघांमध्ये मुख्य फरक ओळखणे म्हणजे विषारी आणि बिनविषारी सापांपासून स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्याचं पहिलं पाऊल आहे.

विषारी साप चावल्यानंतर काय करावे?
कोणताही साप चावल्यास प्रथम घाबरू नका. रुग्णाला शक्यतो शांत ठेवावे. काटलेली जागा कधीही कापू नये,  एकदम टाइट बांधू नये किंवा शोषण्याचा प्रयत्न करू नये. कोणताही घरगुती किंवा चुकीचा उपाय करू नका. रुग्णाला तत्काळ जवळच्या सुसज्ज रुग्णालयात पोहोचवावे, जिथे ASV (Anti- snake venom) उपलब्ध असतो. सापाची ओळख सांगता आली तर उपचारास मदत होईल, पण त्याला शोधण्यात वेळ वाया घालवू नये, लगेच जवळच्या सर्पमित्रला कळवावे किंवा त्वरित रूग्णालयात घेऊन जावा, असे निनाद काकडे यांनी सांगितले.

घोणस आणि अजगर हे मावळ तालुक्यात आढळून येणारे साप आहेत. जून महिन्यात घोणस साप पिल्लांना जन्म देतो आणि त्यामुळे छोटे छोटे घोणस साप सर्वत्र आढळून येतात. चुकून आपला पाय त्यांच्यावर पडल्यास सर्पदंश होऊ शकतो, घोणसचे पिल्लू जन्मल्या जन्मल्या विषारी असतात. घोणस साप एका वेळीस २० ते ६० पिल्लांना जन्म देऊ शकतो. साप किती मोठा आणि सवस्त आहे, त्यावर पिल्लं घालण्याची संख्या अवलंबून असते. तसेच अजगर हा साप पावसाळ्यात जास्त बाहेर पडतो आणि तो साप अंडी घालतो, त्यातून १ ते १.५ फूटचे पिल्लू बाहेर पडतात.

मावळात अगदी १५ फूटपर्यंत अजगर आढळून आले आहेत. तालुक्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र ह्या संस्था वन्यजीव रक्षणांर्थ कार्य करीत आहे. साप हे निसर्गाच्या साखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य माहिती आणि जनजागृती यामुळे सापांबद्दल अज्ञान व भीती दूर होऊन माणूस आणि साप यांचे सहअस्तित्व शक्य होईल, असे वन्यजीव अभ्यासक जिगर सोलंकी यांनी सांगितले.

कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास जवळ पासच्या प्राणीमित्राला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे ९८२२५५५००४ आणि अनिल आंद्रे व शिवदुर्ग मित्र लोणावळा यांचे सुनील गायकवाड यांनी केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar


Previous Post

राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025

Next Post

जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या'चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.