मावळ तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या आरोपीला पिस्तुल बाळगताना अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाच्या वतीने शुक्रवारी (दिनांक 2 जून) रोजी ही कारवाई करण्यात आली. ( accused who released on bail arrested red handed while carrying a pistol )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उमेश चंद्रकांत केदारी (वय 27, रा. कोयतेवस्ती, पुनावळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रावेत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवार (दि. 5) जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे शुक्रवारी (दि. 2 जून) पुनावळे परिसरात पेट्रोलींग करुन माहिती घेत असताना पोलिस हवालदार जगदाळे व पोलिस नाईक गेंगजे यांना गुप्त बातमीदाराकडून आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी इसम उमेश केदारी याला कोयतेवस्ती चौकात असलेल्या एस. के. वडेवाला दुकानासमोरून अटक केली गेली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील मॅग्झीनसह 1 गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
आरोपीवर यापूर्वी कामशेत (ता. मावळ) पोलीस ठाण्यात भादवि कलम 302, 143, 147, 148, 149 आर्म अॅक्ट कलम 4.25. महा. पो. का. कलम 37 (1) (3) सह 135 कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोलीस अंमलदार विक्रम जगदाळे, नितीन गेंगजे, व रामदास मोहीते यांच्या पथकाने केली.
अधिक वाचा –
– शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूच्या घटनांची सखोल चौकशी होणार – जिल्हाधिकारी । Shivrajyabhishek Sohala 2023
– वडगावातील श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या पारदर्शक कार्याचा आदर्श वारकरी संप्रदायाने घ्यावा – खासदार बारणे