आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Nationalist Congress Party) 24 वा वर्धापन दिन अर्थात रौप्य महोत्सवी वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त वडगाव मावळ इथे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विचारधारेतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि दिवंगत कार्यकर्ते, असे ज्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी योगदान दिले, पक्षाच्या अडचणी काळात साथ सोबत दिली अशा मान्यवरांचे स्मरण ठेवून त्यांचा यथोचित सन्मान करून गौरव केला. यावेळी कार्यक्रमात सुमारे 200 ज्येष्ठ मान्यवर व दिवंगत कार्यकर्ते यांच्या कुटुंबातील सदस्य यांचा ट्रॉफी सन्मान देऊन करण्यात आला. ( honoring senior party workers on occasion of NCP 25th anniversary at vadgaon maval )
या प्रसंगी आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादीचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, मा कृषी सभापती बाबुराव वायकर, महिला अध्यक्षा दिपाली गराडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, मा सभापती गणेश ढोरे, युवक अध्यक्ष किशोर सायकर, बाजार समिती सभापती संभाजी शिंदे, उपसभापती नामदेव शेलार, अंकुशराव आंबेकर, काळुराम मालपोटे, सुभाषराव जाधव, तुकाराम ढोरे, ओबीसी अध्यक्ष महिला संध्या थोरात आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्राचे नियोजन माजी नगरसेवक सुनील ढोरे यांनी केले होते.
दरम्यान सर्वात आधी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा बँकेजवळ झेंडा वंदन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष प्रवीण ढोरे, सोमनाथ धोंगडे, विकी ढोरे, बंटी वघावले, संदीप ढोरे, शैलेश वाहिले, शरद ढोरे, मयूर गुरव, विशाल चव्हाण, प्रणव पटेकर, गणेश ढोरे, ओबीसी अध्यक्ष मंगेश खैरे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाते सूत्रसंचालन नगरसेवक चंद्रजीत वाघमारे आणि अतुल राऊत यांनी केले.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठा बदल, लगेच वाचा
– कान्हे गावात पार पडला दिंड्यांमधील विणेकऱ्यांचा सन्मान सोहळा; ‘विणेकरी म्हणजे दिंडीचा आत्मा’ – हभप पुरुषोत्तम मोरे