मावळ तालुक्यातीस प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या साते ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गणेश बोऱ्हाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आरती सागर आगळमे यांचा सरपंच पदाचा नियोजित कार्यकाल संपल्यानंतर, गुरुवार (दिनांक 22 जून 2023) रोजी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक संपन्न झाली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
निर्धारित वेळेत गणेश भाऊ बोऱ्हाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जगताप साहेब आणि मोहरूत साहेब यांनी गणेश बोऱ्हाडे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. याप्रसंगी साते ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आरती आगळमे, उपसरपंच आम्रपाली मोरे, सखाराम काळोखे, ग्रामपंचायत सदस्य ऋषीनाथ आगळमे, संदीप शिंदे, मा सरपंच संतोष शिंदे, वर्षाताई नवघणे, ज्योती आगळमे, श्रुती मोहिते, उपस्थित होते. ( ganesh borhade elected unopposed sarpanch of Sate Gram Panchayat Maval Taluka )
जिल्हा परिषदेचे दुग्ध व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, साते ग्रामपंचायतचे माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब आगळमे, समर्थ पतसंस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर नवघणे, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, यशवंत पतसंस्थेचे मा अध्यक्ष सुदाम आगळमे, माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश शेठ आगळमे, उपसरपंच गोरख बांगर, उद्योजकअतुल वायकर, भाऊसाहेब ढोरे, मा सरपंच विठ्ठल मोहिते, अनिल मोहिते, अर्जुन आगळमे, मारुती जबाजी आगळमे, बंडू आगळमे, दशरथ आगळमे, हिरामण बोऱ्हाडे, संजय आगळमे, सुनील शिंदे ,संजय शिंदे, गजानन शिंदे, अनिल गायकवाड, संदीप शिंदे, विलास आगळमे, विजय उभे, नथू गावडे, दत्तात्रय पांडे, शिक्षक मित्र मारुती दसगुडे, नामदेव गाभणे , देवराम पारीठे, संजय सुर्वे, जालिंदर कोल्हे खिलारी सर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘तुटलेला चेंबर दाखवा आणि नवीन चेंबर बसवा’, मावळातील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाचा अभिनव उपक्रम
– ‘होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन’कडून महिला व बालकांसाठी मोफत विधी सेवा आणि मध्यस्थी चिकित्सालय कक्ष