केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला देशात सत्तेवर येऊन 9 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने देशभर भाजपाच्या वतीने मोदी@9 हे अभियान राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा तर्फे हचिंग्ज स्कूल तळेगाव इथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी “मोदी सरकारचे 9 वर्षांतील यश” असे निबंधाचे शीर्षक विद्यार्थांना देण्यात आले होते. ज्यामध्ये इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी ( दिनांक 30 जून) रोजी शाळेत पार पडला. ( Success of Modi Govt in 9 Years Essay Competition Prizes for Winners at Hutchings School Talegaon Dabhade )
सदर कार्यक्रमाला हिम्मत भाई पुरोहित (उपाध्यक्ष तळेगाव भाजपा), संजय जाधव (सरचिटणीस) विनायक भेगडे तळेगाव भाजपा, नितीन सर (ज्येष्ठ आघाडी अध्यक्ष तळेगाव भाजपा) अनिल वेदपाठक, अंशु पाठक (अध्यक्ष उत्तर भारतीय आघाडी भाजपा तळेगाव) आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– टाकवे खुर्द गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नॅशनल इन्शुरन्स एजन्सीकडून स्कूल बॅग
– काशिग येथील श्री खंडोबा मंदिर देवस्थानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंदिर परिसरात वृक्षलागवड