जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची दिनांक 12 मे 2023 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. आवारे यांच्या हत्येने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ माजली होती. त्यांच्याच हत्येचा बदला घेण्याचा कट रचून मावळ तालुक्यात पुन्हा एकदा धमाका करण्याच्या तयारीत असलेल्या गुंडांच्या मोठ्या टोळीला अटक करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपींचा प्लॅन सपशेल उधळून लावला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट एका टोळीने रचला होता. परंतू पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने त्यांचा कट पूर्ण होण्यापूर्वीच उधळला आहे. तसेच या प्रकरणी नव्याने 5 आणि पूर्वीचे 2 असे एकूण 7 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या 5 सराईत गुन्हेगारांकडून 7 पिस्तूले आणि 21 जिंवत काडतूसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ( Pimpri Chinchwad police arrested five accused who were plotting to avenge Kishor Aware Murder )
पिंपरी चिंचवड पोलिसांनी दहा दिवसांपूर्वीच टोळीचा प्रमुख प्रमोद सोपान सांडभोर (वय 33, रा. हरणेश्वरवाडी, तळेगाव दाभाडे) आणि त्याचा साथीदार शरद मुरलीधर साळवी (वय 30, रा. धनगरबाबा मंदिरामागे काळेवाडी, पिंपरी) यांना गजाआड केले होते. त्यांच्याकडून 4 पिस्तूले आणि 14 काडतूसे जप्त केली होती. त्यांच्या चौकशीत ते इतर 5 साथीदारांसह आवारेंच्या खूनाचा बदला घेण्याचा कटात सामील होते. पण हे दोघे पकडले गेल्याने हा कट उघड झाला आणि पोलिसांनी पुढील तपासात त्यांचे बाकीचे पाच साथीदार यांच्याही मुसक्या आवळल्या.
अमित जयप्रकाश परदेशी (वय 31, रा. तळेगाव दाभाडे), मंगेश भीमराव मोरे (वय 30, रा. वडगाव मावळ), अनिल वसंत पवार (वय 39, रा. तळेगाव दाभाडे), अक्षय उर्फ आर्ची विनोद चौधरी (वय 28, रा. तळेगाव दाभाडे), देवराज (रा. जळगाव जामोद, बुलडाणा) अशी आता पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक केलेले सर्व आरोपी हे पोलिस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, अहमदनगर, तळेगाव दाभाडे, कामशेत, कोपरगाव, चाकण, वडगाव पोलिस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमवून गाड्यांची तोडफोड करून जाळपोळ करणे, बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणे असे 26 गुन्हे दाखल आहेत.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही? मावळातील डी. वाय. पाटील कॉलेजच्या प्राचार्याला बजरंग दलाकडून चोप
– झोपण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अंथरुण दहावेळा चेक कराल..! हातावरुन काहीतरी गेले म्हणून बघितले आणि धक्काच बसला