शिळींब विविध कार्यकारी सोसायटी (मर्यादित शिळींब) चेअरमनपदी बायडाबाई ढमाले, तर व्हाईस चेअरमन पदी गंगाधर जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती संभाजी शिंदे यांच्यासह शिळींब सोसायटीचे सर्व विद्यमान संचालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिळींब सोसायटीचे माजी चेअरमन सचिन शिंदे आणि माजी व्हाईस चेअरमन अनिता धनवे यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कालावधी पूर्ण केल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांच्या निवडीसाठी शिळींब गावातील महादेव मंदिर, गावठाण इथे सोसाटीच्या सर्व सभासदांची विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी विहित मुदतेत चेअरमन पदासाठी बायडाबाई ढमाले तर व्हाईसचेअरमन पदासाठी गंगाधर जगताप यांचे अनुक्रमे एक-एक अर्ज आले. त्यामुळे त्यांची संबंधित पदावर बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. ( Shilimb Society Chairman Post Election Maval Taluka )
यावेळी सोसायटीचे संचालक सचिन शिंदे, अनिता धनवे, सुरेश जगताप, जालिंदर ढमाले, निवृत्ती धनवे, श्याम चोरघे, निवृत्ती कडू, अविनाश शिंदे, मधुकर केदारी, भाऊ शिंदे, बबन आखाडे यांसह बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे, बाजीराव ढमाले, चंद्रकांत शिंदे, भगवान दरेकर, एकनाथ दरेकर आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– राज्यात टोमॅटोच्या दरवाढीने नागरिक हैराण, कृषि आयुक्तांकडून उपाययोजनांसाठी तातडीची बैठक
– पवन मावळ भागात आधुनिक पद्धतीने भात लागवडीला सुरुवात, वारू गावातील शेतकऱ्यांची चारसूत्री पद्धतीला पसंती