व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मावळमधील प्रशासन अलर्ट, तहसीलदारांकडून तालुक्यातील दरडप्रवण गावांची पाहणी

डोंगर दऱ्यांचा तालुका असलेल्या मावळ तालुक्यातील प्रशासन सतर्क झाले असून स्वतः तहसीलदार यांनी गुरुवारी तालुक्यातील दरडप्रवण गावांची पाहणी केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 21, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval-Taluka-Landslide-Prone-Villages

Photo Courtesy : Vijay Surana


रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर 20 जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दरड कोसळली. ह्या घटनेत आतापर्यंत 20 जणांचा बळी गेला आहे. तर अद्यापही शोधकार्य आणि मदतकार्य सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर डोंगर दऱ्यांचा तालुका असलेल्या मावळ तालुक्यातील प्रशासन सतर्क झाले असून स्वतः तहसीलदार यांनी गुरुवारी तालुक्यातील दरडप्रवण गावांची पाहणी केली. ( After Raigad Irshalwadi Landslide Maval Taluka Administration Get Alert Inspection Of Landslide Prone Villages By Tehsildar )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ तालुक्यातील ताजे, लोहगड, बोरज तुंग, माळवाडी, माऊ गबाळेवस्ती, माऊ मोरमाची वाडी, भुशी, आदी दरडप्रवण धोकादायक ठिकाणी तहसीलदार विक्रम देशमुख, बांधकाम खात्याचे उपअभियंता धनराज पाटील, शाखा अभियंता श्रीनिवास पांचाळ, विस्तार अधिकारी बाळासाहेब वायकर, माणिक साबळे यासह अन्य शासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या.

“मावळातील काही ठिकाणे धोकादायक आहेत. त्या ठिकाणच्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या. त्यासोबतच काही परिस्थिती जाणवली, तर काही कुटुंबांना शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासकीय कंट्रोल रूम करण्यात आला आहे. तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. एखादी आपत्तीची घटना घडल्यास सरपंच, पोलिस पाटील किंवा तलाठी सर्कल यांनी त्वरित कंट्रोल रूमला कळवायचे आहे. तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पावसाळा संपेपर्यंत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.

अधिक वाचा –
– ‘या वर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही’, कार्यकर्त्यांनाही आवाहन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला निर्णय
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावांबाबत खासदार बारणेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टवर


Previous Post

तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील जाधववाडी धरण इथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत डेमो कॅम्प

Next Post

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या मावळमधील पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार विक्रम देशमुखांना निवदेन; तहसीलदारांनी दिले ‘हे’ आश्वासन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shivsena-maval-taluka

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या मावळमधील पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार विक्रम देशमुखांना निवदेन; तहसीलदारांनी दिले 'हे' आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.