मावळ तालुक्यातील सेवाधाम आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पी.एफ.सी. क्लब पुणे आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथिनयुक्त आहाराचे वाटप करण्यात आले. आदिवासी आश्रम शाळेतील मुलांची शारीरिक वाढ चांगली व्हावी. त्यांचे आरोग्य निरोगी राहावे. म्हणून शाळेतील विद्यार्थांना पी.एफ.सी. क्लब पुणे यांच्याकडून 100 लिटर दूध, तूरडाळ 100 किलो, सोयाबीन 100 किलो, शेंगदाणे 50 किलो या प्रकारचे प्रथिनयुक्त साहित्य शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आले. ( Hope For The Children Foundation Gave Huge Food Grains To Students Of Sevadham Trust Ashram School In Maval Taluka )
यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याद्यापक भोर सर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनचे समुदाय विकास समन्वयक ऋषिकेश डिंबळे यांनी केले. तसेच, विद्यार्थ्यांना चांगले आरोग्य कसे ठेवावे, या संदर्भात पी.एफ.सी. क्लबचे यश राठोड यांनी मार्गदर्शन केले. ह्यावेळी पी.एफ.सी. क्लबचे मान्यवर चिराग, अनिकेत, अंकित, सतेज, आदिश आणि शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने आदिवासी समाज राहतो. यात कातकरी, ठाकर आदिवासी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. वर्षानूवर्षे डोंगर – दऱ्यात राहणारा हा घटक आता कुठे हळूहळू मुळ प्रवाहात येऊ लागला आहे. शासनाकडून त्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, तरीही म्हणावे तसे सामाजिकरण ह्या घटकाचे अद्याप झालेले नाही. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा ह्या सर्व बाबी आदिवासी समाजापर्यंत पोहोचाव्यात ह्यासाठी एकट्या सरकारचे प्रयत्न पुरेसे पडणार नाहीत, अशावेळी समाजसेवी घटक, एनजीओ यांचाही ह्यात हातभार असणे आवश्यक आहे. सद्यमितीला मावळ तालुक्यात अनेक समाजसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या होप फॉर दि चिल्ड्रेन संस्थेकडून मागील अनेक वर्षांपासून मावळ तालुक्यातील आदिवासी समाजासाठी मदतकार्य केले जात आहे. ( Hope For The Children Foundation Gave Huge Food Grains To Students Of Sevadham Trust Ashram School In Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अधिवेशनात घुमला मावळचा आव्वाज..! तालुक्यातील विविध प्रश्नांकडे आमदार शेळकेंनी वेधले सभागृहाचे लक्ष
– सावित्रीच्या लेकींनी घडवला इतिहास! दारुंब्रे शाळेचे नाव जिल्ह्यात गाजवले, आई-वडील अन् शिक्षकांच्या आनंदाला उधाण