सततच्या पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील काही भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रविवारी (दिनांक 23 जुलै) रात्री पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर डोशी बोगद्याजवळ किलोमीटर 41 जवळ दरड कोसळली होती. त्यामुळे पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या तीन लेन बंद करण्यात आल्या होत्या, तर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
त्याच पार्श्वभूमीवर दरड मधील डोंगरावरील अडकलेले दगड पाडण्यासाठी आज गुरुवार, दिनांक 27 जुलै 2023 रोजी दुपारी 12 ते 2 वाजे दरम्यान एक्सप्रेस वे वरील मुंबई वाहिनी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तसेच फक्त छोटी वाहने अर्थात कारसाठी जुना पुणे मुंबई महामार्ग शींग्रोबा घाटातील सुरू राहील, अशी सुचना योगेश भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक – बोरघाट म पो केंद्र, रायगड यांच्याकडून देण्यात आली आहे. ( two hours mega block will be taken to remove cracks in borghat on Mumbai Pune Expressway )
मागील आठवडाभरापासून मावळ प्रांतात आणि घाटमाथ्यावर तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भुस्खलन अथवा दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा सतत वाहनांचा राबता असणारा राज्यातील प्रमुख महामार्ग, या ठिकाणी रविवारी रात्री दरड कोसळली होती. सुदैवाने तेव्हा जिवितहानी झाली नाही, परंतू पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून उपाययोजना करण्यात येणार आहेत.
रायगड जिल्हा आणि मुंबई भागात गुरुवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच रेड अलर्टमुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. रायगड मध्येही अनेक ठिकाणी नागरिकांचे स्तलांतरण सुरु असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आाले आहे. तसेच तळकोकणात रत्नागिरीमध्येही रेड अलर्ट असल्यामुळे शाळांना सुट्टी द्यायचा निर्णय घेण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– श्री देवदर्शन यात्रा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या बाल वारकरी वेशभूषा संमेलन ऑनलाईन स्पर्धेची पारितोषिके प्रदान
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत