पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाताना कामशेत बोगद्यालगत दरड कोसळल्याची घटना घडली आहे. आज गुरुवार (दिनांक 27 जुलै) रात्री साडेसातच्या सुमारास ही दरड कोसळली. दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन बंद झाल्या असून एका लेनने वाहतूक सुरु आहे. परिणामी मुंबईकडे जाणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. ( Breaking News Crack collapses near Kamshet tunnel On Mumbai Pune Expressway )
दरड कोसळल्याची माहिती मिळताच आयआरबी, महामार्ग पोलिस आदी यंत्रणा घटनास्थळी आल्या असून त्यांच्या मार्फत दरडीमुळे रस्त्यावर पसरलेला राडारोडा बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. वाहतूक पुर्णतः स्तब्ध झालेली नसून लवकरच रस्ता पूर्णतः क्लिन होऊन तो वाहतूकीसाठी खुला होईल अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यातही पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. मावळमध्ये पवन मावळ, आंदर मावळ आणि लोेणावळा शहर आणि भागात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. घाटमाथ्याचा भाग असलेल्या या ठिकाणी पावसामुळे डोंगरांना भेगा पडण्याच्या किंवा अंतस्थः पाण्याचे प्रवाह याने दरड कोसळण्याच्या घटना वाढतात.
चालू आठवड्यात रविवारी (दिनांक 23 जलै) रोजी मुंबई पुणे महामार्गावर आडोशी बोगदा इथे दरड कोसळली होती, त्यामुळे महामार्गावर दरड हटवण्यासाठी दोन वेळा ब्लॉक घ्यावा लागला. त्यानंतर आज पुन्हा एकदा कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला. पावसाचा जोर आणखीन काही दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडणे पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘हॅलो! तुमचे विम्याचे पैसे आलेत पण….’ वयोवृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत