हॅन्ड इन हॅन्ड इंडिया तळेगाव दाभाडे ( Hand in Hand India NGO ) आणि शॉक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत यांच्या मार्फत खेड, चाकण विभागातील मोई, चिंबली, कुरुळी, माजगाव या गावांमध्ये महिला सक्षमीकरण यावर काम करण्यात येत आहे. त्यातील मोई या गावात दहा दिवसीय मेहंदी प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण व सबलीकरण असून विविध प्रकारच्या महिला बचत गटांना कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच त्यांना उद्योग निर्मितीसाठी सहाय्य करणे हा आहे. त्याअंतर्गत मोई (ता. खेड, जि. पुणे) या ठिकाणी दिनांक 16 जुलै 2023 ते 25 जुलै 2023 या कालावधीत महिलांना मेहंदी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये एकूण 19 महिलांनी सहभाग घेतला.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून वैभवी लांबकाने यांनी काम केले. तसेच हॅन्ड इन हॅन्ड कडून ओंकार कुलकर्णी, सुवर्णा करपे, सारिका शिंदे, मोई गावातील बचत गटातील सदस्य उपस्थित होते. यावेळी ओंकार कुलकर्णी यांनी ग्रामपंचायत मोई सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचे आभार मानले. ( mehndi training for women in Moi village Khed taluka through Hand in Hand India NGO Talegaon )
हॅन्ड इन हॅन्ड इंडिया ही एक सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. मागील आठ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये महिला बचत गट सक्षमीकरण, महिला कौशल्य विकास आणि उद्योग निर्मिती, नैसर्गिक संसाधने विकास अशा विविध सामाजिक विषयावर गरिबी निर्मूलन व रोजगार निर्मितीचे कार्य करत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत
– ‘हॅलो! तुमचे विम्याचे पैसे आलेत पण….’ वयोवृद्धाची मोठी आर्थिक फसवणूक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल