कला विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. एन.डी. स्टुडिओमध्येच गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं आहे. ही माहिती समोर येताच सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ( Art Director Nitin Desai Dies By Suicide At ND Studio In Karjat Maharashtra )
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गळफास घेऊन नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केलेले चित्रपट ;
परिंदा (1989) 1941- ओ लव्ह स्टोरी (1993) आ गले लग जा (1994) अकेले हम अकेले तुम (1995) खामोशीः द म्युझिकल (1996) दिलजले (1996) माचीस (1996) इश्क (1997) प्यार तो होना ही था (1998) हम दिल दे चुके सनम (1999) बादशहा (1999) जोश (2000) मिशन कश्मीर (2000) वन टू का फोर (2001) द लेजेन्ट ऑफ भगतसिंग (20002) मुन्नाभाई एम.बी.बी.एस. (2003) लगे रहो मुन्नाभाई (2006) धन धना धन गोल (2007) गॉड तुस्सी ग्रेट हो (2008) दोस्ताना (2008) वन्स अपॉन टाइम्स इन मुंबई (2009) बालगंधर्व (2011)
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे सौभाग्य’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी
– मावळात 80 टक्के भात लागवडी पूर्ण; पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित शेतकऱ्यांचीही लवकरच ‘वाढऔंज’