पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. ह्याचे कारण एकीकडे भाजपचेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी हा प्रकल्प कार्यन्वित व्हावा, यासाठी आग्रह धरला आहे. तर त्याचवेळी दुसरीकडे मावळ तालुक्यातील भाजपा नेते पदाधिकारी मात्र हा प्रकल्प कायमचा रद्द व्हावा, या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात पवनेचे पाणी पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ( cancel pavana aqueduct project permanently demand by BJPs ravindra bhegade )
भाजपा मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी मावळ तालुका तहसीलदार यांना याबाबत एक पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी, शासनाने स्थगिती दिलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करणे बाबत लिहिले आहे. “मावळ तालुक्यातील शेतकरी व जनतेच्या वतीने आपल्या निदर्शनास आणु इच्छितो कि. पवना धरण ते निगडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पास सुरवातीपासूनच तालुक्यातील शेतकऱ्यांसह भारतीय जनता पार्टीचा तीव्र विरोध होता, आहे व कायम राहील.” असे स्प्टपणे रविंद्र भेगडे ह्यांनी लिहिले आहे.
तसेच, “पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा यासाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह भारतीय जनता पार्टी व भारतीय किसान संघाच्या वतीने तात्कालीन सरकारच्या विरोधात दिनांक 9 ऑगस्ट 2011 रोजी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बऊर फाटा येथे तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकरी बांधव शहीद झाले. तर काही शेतकरी जखमी झाले होते. ही बाब शासनाने गांभीर्यपूर्वक लक्षात घेऊन तात्कालीन मुख्यमंत्री मा.श्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी या प्रकल्पास स्थगिती देण्याचे आदेश दिलेले आहेत ते आजतागायत कायम आहेत.तरी या प्रकल्पास तालुक्यातील शेतकरी बांधवांचा विरोध लक्षात घेता हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल याची आपण नोंद घ्यावी.” असे खुले पत्र रविंद्र भेगडे यांना तहसीलदार मावळ विक्रम देशमुख यांना लिहिले आहे. ( cancel pavana aqueduct project permanently demand by BJPs ravindra bhegade )
महेश लांडगे ह्यांनी विधानसभेत उपस्थित केला होता मुद्दा….
पवना बंदिस्त जलवाहिनीच्या प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेत हा मुद्दा लक्षवेधीत मांडला होता. पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत पावसाळी अधिवेशनात लांडगेंनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून प्रकल्पाचा “जैसे थे” आदेश रद्द करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बुचडे-पाटील यांची एकमताने फेरनिवड
– अत्यंत धक्कादायक बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
– अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच..! काँग्रेसच्या हायकमांडने ‘या’ नेत्यावर सोपवली जबाबदारी