मणिपूर येथील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना तसेच मनोहर भिडे गुरुजी यांनी महापुरुषांबाबत केलेली अवमानकारक विधाने, याविरोधात पुणे जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस, मावळ तालुका युवक काँग्रेस व देहूरोड शहरच्या वतीने देहूरोड येथे आंदोलन करण्यात आले. मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. संबंधित नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करीत केंद्र सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. ( Protest of Pune Youth Congress at Dehu Road Against Manohar Bhide Guruji )
मणिपूर येथे 2 आदिवासी महिलांची नग्न धिंड काढण्याचा घृणास्पद व्हिडिओ समोर आला आणि माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण भारत देश हादरला असून सर्वत्र संताप उसळला आहे. याबाबत काँग्रेस आक्रमक झाली असून सोमवारी, 31 जुलै मणिपूर येथील अमानवीय घटनेच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. महेश टापरे, मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मा. राजेश वाघोले, उपाध्यक्ष कौस्तुभ ढमाले, देहूरोड शहराध्यक्ष मलिक शेख प्रतिभाताई हिरे, गफूरभाई शेख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला अध्यक्ष यांनी महिलांच्या होणाऱ्या अत्याचारावर जाहीर निषेध नोंदवला. काँग्रेसचे देहूरोड शहर अध्यक्ष हाजीमलंग मारिमुत्तू, मावळ तालुका युवक अध्यक्ष राजेश वाघोले, रामदास काकडे, यशवंत मोहोळ, सातकर दादा, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष महेश टापरे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष कौस्तुभ ढमाले, प्रांतिक सदस्य दीपक सायसर, मावळ तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष गफूरभाई शेख, मावळ तालुका युवक सरचिटणीस नेणार हरपुडे, विनोद पवार मावळ तालुका विद्यार्थी अध्यक्ष पवन गायकवाड, महिला अध्यक्षा प्रतिमा हिरे, सचिन हिरे, रईस शेख (मावळ तालुका युवक उपाध्यक्ष, असिफ सय्यद उपाध्यक्ष निलेश बोडके, उपाध्यक्ष राजू ठोकळे, प्रभाग क्र 24 अध्यक्ष रोहन राऊत व देहूरोड शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अत्यंत धक्कादायक बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
– अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच..! काँग्रेसच्या हायकमांडने ‘या’ नेत्यावर सोपवली जबाबदारी
– लोणावळा स्टेशनसह देशातील तब्बल 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट । Amrit Bharat Station Scheme