तळेगाव दाभाडे शहर नगरपरिषदेच्या ( Talegaon Dabhade Municipal Council ) प्रशासकीय इमारतीची नव्याने बांधणी करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वीच झालेल्या भूमीपुजन समारंभानंतर या प्रस्तावित इमारतीच्या कामाचा आढावा मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी गुरुवारी (8 सप्टेंबर) रोजी घेतला.
‘मावळ तालुक्यातील ऐतिहासिक तळेगाव दाभाडे शहरातील नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. पाऊस कमी झाल्यानंतर कामास सुरुवात होणार आहे. नवीन प्रशासकीय इमारत शहराच्या वैभवात भर पाडणारी असावी, यासाठी हे काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे’, असे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी आमदार शेळके यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांनीही कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचना केल्या. यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्या माझ्यासह, तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगरसेवक अरुण माने, आदी मान्यवर उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke Reviewed Administrative Building Work Of Talegaon Dabhade Municipal Council )
अधिक वाचा –
वडिलांच्या त्रासाला कंटाळून घरातून पळालेल्या कुसगावमधल्या दोघी बहिणी ‘इथे’ सापडल्या
मावळमध्ये मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार? ‘या’ भेटीने चर्चेला उधाण