देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर अमन कटोच (Brigadier Aman Katoch) यांची आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke ) यांनी शुक्रवारी (दिनांक 11 ऑगस्ट) रोजी भेट घेतली. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जागेबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्यांवर चर्चा यावेळी झाली. यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार पिंजण, राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोड शहराध्यक्ष प्रवीण झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. ( Dehuroad Cantonment Board News )
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. कामे अपूर्ण असल्यामुळे सार्वजनिक विकासावर याचा परिणाम होत असुन यामुळे नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रलंबित असलेल्या कामांचा प्राधान्याने विचार करुन त्या कामांना गती द्यावी, अशी मागणी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर अमन कटोच यांच्याकडे आमदार सुनिल शेळके यांनी केली. त्यावर बोर्ड विकासकामांबाबत सकारात्मक असून सार्वजनिक कामांना कुठलीही बाधा येणार नाही, असे आश्वासन ब्रिगेडियर अमन कटोच यांनी आमदार शेळकेंना दिले. ( Dehuroad Cantonment Board News )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पवन मावळमधील ‘या’ रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न; नागरिकांची त्रासापासून सुटका होणार
– अभिनंदन कबीर! वडगावच्या सुपुत्राचे जेईई परीक्षेत उज्वल यश । Vadgaon Maval
– पुणे जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर । Lok Adalat