लोणावळा शहरातील नेत्यांचा मनसे पक्षात जाहीर प्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर अध्यक्ष भारत चिकणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दिनांक 11 ऑगस्ट) रोजी मावळगड वडगांव इथे मिराताई भोसले, दीपमालालाई बोभाटे, रुपालीताई मखरे, शोभाताई बोभाटे तसेच संदीप बोभाटे, विरारजी गाला, प्रवीण मखरे, निलेश लांडगे या कार्यकर्त्यांचा मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर तसेच मनसे महिला तालुका अध्यक्ष ज्योतीताई पिंजन यांच्या हस्ते जाहीर पक्ष प्रवेश करून घेण्यात आला. या प्रसंगी तानाजी तोडकर, सुरेश जाधव तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसच्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई इथे दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली होती. सदर बैठकीत लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची सविस्तर माहिती मिळावी याकरीता लोकसभा मतदारसंघ क्षेत्र निहाय निरिक्षक व समन्वयकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. दिनांक 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट रोजी शहरात लोकसभा मतदारसंघ निवडणुकांच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि निरीक्षक शहरात येत असल्याने त्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आज (शनिवारी) दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची तातडीची बैठक घेण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुणे विभागस्तरीय पुरस्कार जाहीर; बनवडी ग्रामपंचायत प्रथम
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज? मुंबई-पुणे सोडून कालपासून साताऱ्यातच मुक्काम, नेमकं काय झालंय? वाचा सविस्तर
– ‘लोणावळा वुमन्स फाउंडेशन’च्या वतीने ‘स्वतंत्र महिला’ कार्यक्रमाचे आयोजन; IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून मार्गदर्शन