व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हर घर तिरंगा – मेरी माटी मेरा देश – पंचप्रण शपथ । पवनानगरमधील पवना शिक्षण संकुलात देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पवनानगर परिसरामध्ये भारत देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 16, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Independence-Day-pavananagar

Photo Courtesy : Bharat Kale


पवनानगर परिसरामध्ये भारत देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाने यावर्षी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंतत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा यावेळी अनेक ठिकाणी विविध उपक्रम यामध्ये हर घर तिरंगा, मेरी माटी मेरा देश, पंचप्रण शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी ध्वजारोहण निमित्त अनेक ठिकाणी प्रभातफेरी, प्रकारच्या स्पर्धा, शालेय साहित्य वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ( Har Ghar Tiranga Meri Mati Mera Desh Panchprana Swear Independence Day celebrated at Pavananagar )

पवना विद्या मंदिर शळेत स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सावा निमित्त शासनाच्या हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत संपूर्ण पवानानगर येथे रॅली काढुन जनजागृती करण्यात आली होती. पहिल्या (ता.१३ ) दिवसाचे ध्वजारोहणाचा मान पवना शिक्षण संकुलाच्या प्राचार्या श्री.भाऊसाहेब आगळमे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, दुसऱ्या दिवसाचे ध्वजारोहण पवना विद्या मंदिराचे माजी विद्यार्थी व व्यापरी मित्र मंडळाचे उपाध्यक्ष संदीप बुटाला यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी काले गावचे जेष्ठ नागरिक ह.भ.प. ज्ञानोबा महाराज कालेकर, पवना शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर,काले गावच्या पोलिस पाटील सीमाताई यादव, शाळेचे माजी विद्यार्थी सुनील बुटाला, संदिप भुतडा, शक्ती जव्हेरी, जेष्ठ पत्रकार माऊली ठाकर, येळसे गावचे सरपंच व उद्योजक मुकुंद ठाकर, विठ्ठल ठाकर, उद्योजक सचिन साबळे, संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर यांच्यासह प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

काल ( ता.१५ ) ध्वजाचे पूजन शालेय समिती सदस्य प्रल्हाद कालेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर अमृत महोत्सवी ध्वजारोहण काले ग्रामपंचायत सदस्या सौ‌. योगिता श्रीकांत मोहोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच खंडुजी कालेकर, उपसरपंच अमित कुंभार, ग्रामपंचायत सदस्या छायाताई कालेकर, शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, नितीन बुटाला, रामदास मोहोळ, किशोर शिर्के यांच्यासह ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शाळेत हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, मेरी माटी मेरा देश, पंचप्रण शपथ व परिसरातील स्वातंत्र्य सैनिक व सैनिक यांचा सत्कार व व्दीप प्रज्वलन करुन देशाच्या संरक्षण करणाऱ्यांना मानवंदना असे विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव ढाकणे यांनी केले तर सुत्रसंचलन भारत काळे यांनी केले. ( Har Ghar Tiranga Meri Mati Mera Desh Panchprana Swear Independence Day celebrated at Pavananagar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील इंदोरी आणि सुदुंबरे येथील 284 आदिवासी ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप
– आ-चंद्रसुर्य नांदो…स्वातंत्र्य भारताचे! वडगाव मावळ इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण, ‘या’ कुटुंबाचा केला सन्मान
– नागरिकांनो, डोळ्यांची काळजी घ्या! डोळे येण्याच्या आजारापासून बचावासाठी वडगावात तब्बल 3000 आय ड्रॉपचे वाटप


Previous Post

अडीच हजार महिला भगिनींच्या उपस्थितीत वडगावमध्ये श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण; हळदी-कुंकू समारंभाने कार्यक्रमाची सांगता

Next Post

स्वातंत्र्यदिनी तिरंगा रॅली, ढोल-ताशाच्या गजरात स्वातंत्र्यसैनिकांची मिरवणूक, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval

स्वातंत्र्यदिनी तिरंगा रॅली, ढोल-ताशाच्या गजरात स्वातंत्र्यसैनिकांची मिरवणूक, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.