व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील इंदोरी आणि सुदुंबरे येथील 284 आदिवासी ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप

आमदार सुनिल शेळके ह्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच हस्ते आदिवासी बांधवांना दाखले वितरीत करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 16, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
caste-certificate-to-tribal

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


आदिम सेवा अभियान अंतर्गत मावळ तालुक्यातील इंदोरी व सुदुंबरे येथील 284 आदिवासी ठाकर बांधवांना मंगळवारी (दिनांक 15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ‘जात प्रमाणपत्राचे वाटप’ करण्यात आले. आमदार सुनिल शेळके ह्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच हस्ते आदिवासी बांधवांना दाखले वितरीत करण्यात आले. ( distribution of caste certificate to 284 tribal thakar brothers of indori and sudumbare village in maval taluka )

‘आपण एकीकडे देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही आदिवासी ठाकर समाजातील अनेक बांधव जातीच्या दाखल्यांपासून वंचित आहेत. शैक्षणिक कामांसाठी,शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. परंतु ज्यांचे पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दुर होते तसेच भूमिहीन होते, अशा कुटुंबातील नागरिकांना मात्र जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मानसिक त्रास सहन करावा लागतो.’

‘आजपर्यंत विविध शिबिरे,योजनांच्या नावाखाली केवळ कागदपत्रे जमा केली जात होती. परंतु अखेरपर्यंत पाठपुरावा करुन सर्व प्रक्रिया पूर्ण करुन कोणीही दाखले मिळवुन देत नव्हते. त्यामुळे आश्वासनांशिवाय या बांधवांच्या पदरात काहीच पडले नव्हते. प्रत्येक वेळी दाखला काढण्यासाठी कागदपत्रांची करावी लागणारी जुळवाजुळव आणि सरकारी कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे आणि एवढे करुनही दाखले मिळत नव्हते, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागायचा.’

“आज हा समाज सक्षम होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना पाठबळ देणे हे माझे कर्तव्य आहे.निःस्वार्थ भावनेने काम करायचे ठरविल्यास आशेचा किरण हा नक्कीच दिसतो आणि याच भावनेने प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे व शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे यामुळे हे अभियान यशस्वी झाले. माझ्या बांधवांना त्यांचा अधिकार मिळाला याचे मला समाधान आहे. फक्त आश्वासने न देता त्यांच्या समस्या प्रत्यक्षात सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील,’ असे आश्वासन प्रमाणपत्रे वाटपावेळी आमदार सुनिल शेळके यांनी दिले.

सदर कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके यांच्य़ासमवेत, मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, दिपक हुलावळे, इंदोरी सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच धनश्रीताई काशीद, मंडलाधिकारी बजरंग मेकाले आणि इंदुरी, सुदुंबरे येथील आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– रेल्वे सुरक्षा बलाकडून व्हिपीएस विद्यालयात रेल्वे सुरक्षेचे धडे । Lonavala News
– दैनिक मावळ बुलेटीन : ‘पुणे मेट्रोचे स्टिअरिंग मावळ कन्येच्या हाती’ । ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांवरील कारवाईला स्थगिती
– प्रवासासाठी घराबाहेर पडताय? ही बातमी वाचा… द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी!


dainik maval jahirat

Previous Post

आ-चंद्रसुर्य नांदो…स्वातंत्र्य भारताचे! वडगाव मावळ इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण, ‘या’ कुटुंबाचा केला सन्मान

Next Post

गोडुंब्रे इथे 75 वृक्षांची लागवड; ‘माझी माती – माझा देश’ अभियानांतर्गत ग्रामस्थांनी शहीद वीरांना केले वंदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
meri-mati-mera-desh

गोडुंब्रे इथे 75 वृक्षांची लागवड; 'माझी माती - माझा देश' अभियानांतर्गत ग्रामस्थांनी शहीद वीरांना केले वंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.