व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, December 7, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दैनिक मावळ बुलेटीन : ‘पुणे मेट्रोचे स्टिअरिंग मावळ कन्येच्या हाती’ । ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांवरील कारवाईला स्थगिती

दैनिक मावळ बुलेटीनच्या माध्यमातून एकाच क्लिकवर घ्या मावळ तालुक्यातील विविध घटनांचा संक्षिप्त आढावा...

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 14, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Dainik-Maval-Bulletin

Dainik Maval Bulletin


पुणे मेट्रोचे स्टिअरिंग मावळ कन्येच्या हाती – मावळ तालुक्यातील नायगाव या खेडेगावातील रहिवासी सविता अविनाश गाडे यांची पुणे मेट्रो पायलटपदी निवड झाल्याबदल नायगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सविता गाडे या मावळातील नायगाव येथील रहिवासी अविनाश गाडे यांच्या पत्नी आहेत. त्यांचे माहेर गोराई 1 ( मुंबई ) येथील असून, त्यांचे शिक्षणही मुंबईलाच झाले आहे. त्या बीई मेकॅनिकल असून, नुकत्याच घेण्यात आलेल्या मेट्रो पायलटच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्या पुणे मेट्रोच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. 45 दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आता त्या आवश्यकतेनुसार पिंपरी – चिंचवड ते सिव्हिल कोर्ट अथवा वनाज ते रूबी हॉल या दोन्ही मार्गावर मेट्रो पायलट म्हणून कार्यरत आहेत. नायगाव ग्रामस्थांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब असल्याने गावच्या वतीने त्यांचा नुकताच नागरी सत्कार करण्यात आला.

लोणावळ्यात भव्य राखी प्रदर्शन – लोणावळा वुमन्स फाउंडेशनच्या वतीने भव्य राखी प्रदर्शन तसेच विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला IPS सत्यसाई कार्तिक यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व व्यवसायिक महिलांचे अभिनंदन केले तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राखी प्रदर्शन बघण्यासाठी तसेच राखी खरेदी करण्यासाठी महिला, तरुणी, विद्यार्थिनींनी मोठी गर्दी यावेळी केल्याचे दिसून आले. फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या स्थानिक महिलांना सक्षम करण्याचे उद्देश असून येणाऱ्या काळात असे अनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत अशी माहिती फाउंडेशनच्या संस्थापक ब्रिंदा गणात्रा यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.

कुसगाव बु. ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रता कारवाईस स्थगिती – कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांवरील अपात्रतेच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली आहे. पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले आहेत. सरकारी जागेत अतिक्रमण करत बांधकाम केल्याप्रकरणी सत्ताधारी गटातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश वसंत गुंजाळ, सुजाता रामचंद्र ठुले, फरिन मज्जिद शेख, शैला भरत मोरे यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अपात्र ठरविले होते. या निकालाच्या विरोधात अपात्र सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती. अपात्रतेचा निकाल सुस्पष्ट नसल्याचा दाखला देत नैसर्गिक न्यायाने अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्या निकालास स्थगिती दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 14 सप्टेंबरला होणार आहे.

लोणावळ्यात गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप – प्रमोद जव्हेरी फाउंडेशनच्या वतीने परिसरातील 25 गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. फाउंडेशनच्या अध्यक्षा फाल्गुनी जव्हेरी, जिंजर दवे, चंद्रकांत नाईक, प्रताप पंडित, कल्पना काकडे, योगिता कोकरे, विजय सिनकर, रचना सिनकर, अरुण लाड, अर्जुन पाठारे, चारुलता कमलवार, सुजाता मेहता, रेश्मा शेख, सुरेखा पाडाळे, नंदकुमार जोशी उपस्थित होते. गरजू, होतकरू आणि प्रशिक्षित महिलांना मदतीचा हात देण्यात येतो, असे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले. पुजारी म्हणाले, ‘‘महिलांनी अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होणार आहे.’’

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘अवजड’ बुद्धीच्या वाहन चालकांमुळे सामन्यांचे जीव धोक्यात, हाईट बॅरिकेट्स पुन्हा निकामी! MSRDC कडूनही दुर्लक्ष
– पदभार स्विकारताना सरपंचाने घेतली संविधान शपथ! मुळशी तालुक्यातील पौड गावातील घटना, राज्यात होतेय चर्चा – Video
– दुर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान मावळ तालुका संस्थेची नूतन कार्यकारणी जाहीर, पाहा संपूर्ण यादी


dainik maval jahirat

Previous Post

प्रवासासाठी घराबाहेर पडताय? ही बातमी वाचा… द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी!

Next Post

रेल्वे सुरक्षा बलाकडून व्हिपीएस विद्यालयात रेल्वे सुरक्षेचे धडे । Lonavala News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
VPS-Collage-Lonavala

रेल्वे सुरक्षा बलाकडून व्हिपीएस विद्यालयात रेल्वे सुरक्षेचे धडे । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Indian-Railway

मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…

December 6, 2025
Chandrashekhar-Bawankule

राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना

December 6, 2025
Dattatray alias Bhausaheb Gund hotly discussed as an effective candidate in Kale-Kusgaon Zilla Parishad group

काले-कुसगांव जिल्हा परिषद गटातील प्रभावी उमेदवार म्हणून दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या नावाची जोरदार चर्चा । Bhausaheb Gund

December 6, 2025
Moving towards electricity bill-free farming Solar Agricultural Pump on Demand scheme for farmers

वीजबिल मुक्त शेतीकडे वाटचाल… शेतकऱ्यांच्या हिताची ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना – जाणून घ्या

December 6, 2025
Lonavala-Gramin-Police

लोणावळा ग्रामीण पोलिसांची चमकदार कामगिरी ! हरविलेले व चोरीला गेलेले ३५ मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द । Lonavala Police

December 5, 2025
Lonavala Municipal Council General Election

काँटे की टक्कर असलेल्या लोणावळा नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे मतदान ठरणार निर्णायक । Lonavala Nagar Parishad

December 5, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.