व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पदभार स्विकारताना सरपंचाने घेतली संविधान शपथ! मुळशी तालुक्यातील पौड गावातील घटना, राज्यात होतेय चर्चा – Video

भारतातील पंचायत राज व्यवस्थेत महत्वाचा घटक असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य अथवा त्यांचा प्रमुख अर्थात सरपंच यांनी शपथ घेण्याची प्रथा आपल्याकडे नाही.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 13, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, व्हिडिओ
Paud-Gram-Panchayat-Mulshi-Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


आपल्या देशामध्ये केंद्रात अथवा राज्यात मंत्री किंवा सरकारी सेवेतील अधिकारी हे कर्तव्याची शपथ घेतात. यात अगदी राष्ट्रपतींपासून ते पोलिस अधिकारी आदींचा समावेश होतो. पंतप्रधान, मंत्री यांचे शपथविधी सोहळे हे एखाद्या जंगी कार्यक्रमांसारखे असतात. पंरतू भारतातील पंचायत राज व्यवस्थेत महत्वाचा घटक असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य अथवा त्यांचा प्रमुख अर्थात सरपंच यांनी शपथ घेण्याची प्रथा आपल्याकडे नाही. मात्र, मुळशी तालुक्याचे केंद्र असलेल्या पौड ग्रामपंचायतच्या नवनियुक्त सरपंच प्रमोद शेलार यांनी पदभार स्विकारताना घेतलेल्या शपथेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. ( Paud Gram Panchayat Sarpanch Pramod Shelar Take Constitution Oath Mulshi Taluka Watch Video )

Novel NIBR Ads

ग्रामपंचायत पौड ही मुळशी तालुक्यातील सर्वात महत्वाची ग्रामपंचायत आहे. ह्याचे कारण मुळशी तालुक्याचे तहसील आणि पोलिस केंद्र हे पौड येथे आहे. पौड तालुक्याचे गाव असल्याने येथील ग्रामपंचायत तितकीच जबाबदार आणि महत्वाची आहे. या ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच अजय कडू यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कार्यकाळ पुर्ण केल्याने पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रमोद शेलार यांचा एकमेव अर्ज आला, त्यामुळे पौडच्या सरपंच पदी प्रमोद शेलार हे बिनविरोध निवडले गेले.

त्यानंतर पौडचे ग्रामविकास अधिकारी विनोद दूधाळ यांनी नवनियुक्त सरपंच प्रमोद शेलार यांना संविधान शपथ दिली. प्रमोद शेलार यांच्याच कल्पनेतून हा शपथविधी सोहळा झाला. ‘आपण ज्या पदावर आहोत, त्या पदाकडे हजारो जनांच्या आशा अपेक्षा आहेत. त्या पुर्ण करण्यासाठी आपण संविधानाच्याच तत्वाने चालले पाहिजे. महापुरुषांच्या विचारांवर चालले पाहिजे. या हेतूने सरपंच म्हणून कामकाज सुरु करण्यापूर्वी आपण ही शपथ घेऊन स्वतःला बांधून घेतले’ अशी प्रतिक्रिया प्रमोद शेलार यांनी दैनिक मावळसोबत बोलताना दिली.

पदभार स्विकारण्यापूर्वी आईवडीलांना वंदन करत, ग्रामदैवतांचे स्मरण करत, छत्रपती शिवराय आणि अन्य महापुरुषांना वंदन करुन संविधान साक्ष घेत प्रमोद शेलार यांनी कामाला सुरुवात केलीये, ही गोष्ट राज्यातील इतर ग्रामपंचायतींना आदर्श आहे. सरपंचाने पदभार स्विकारण्याआधी शपथ घेण्याचे हे दुर्मिळ उदाहरण पुणे जिल्ह्यात प्रथमच घडले आहे. तसेच हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ( Paud Gram Panchayat Sarpanch Pramod Shelar Take Constitution Oath Mulshi Taluka )

View this post on Instagram

A post shared by Dainik Maval दैनिक मावळ (@dainikmaval)

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ बुलेटीन : मावळ मनसेत ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; मावळ लोकसभा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरात “हर घर तिरंगा” अभियानामुळे राष्ट्रप्रेमाचे उत्स्फूर्त दर्शन
– वाडिवळे शाळेतील विद्यार्थ्यांना सीआयई इंडिया (CIE INDIA) कंपनीकडून शैक्षणिक साहित्यांचे कीट वाटप


dainik maval jahirat

Previous Post

दुर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान मावळ तालुका संस्थेची नूतन कार्यकारणी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Next Post

‘अवजड’ बुद्धीच्या वाहन चालकांमुळे सामन्यांचे जीव धोक्यात, हाईट बॅरिकेट्स पुन्हा निकामी! MSRDC कडूनही दुर्लक्ष

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mumbai-Pune-Highway

'अवजड' बुद्धीच्या वाहन चालकांमुळे सामन्यांचे जीव धोक्यात, हाईट बॅरिकेट्स पुन्हा निकामी! MSRDC कडूनही दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.