आमदार सुनिल शेळके यांनी पवनमावळ भागातील विविध गावांतील जनतेच्या समस्या आणि विकास कामांचा शनिवारी (दिनांक 19 ऑगस्ट) आढावा घेतला. काले येथील शांताई मंगल कार्यालय इथे ही आढावा बैठक पार पडली. पवनमावळ भागातल्या परिसरातील 30 ते 40 गावांतील प्रमुख पदाधिकारी, सरपंच, ग्राम सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke reviewed development works in various villages of Pavan Maval area )
सरपंच – उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे त्यांच्या त्यांच्या गावांतील विकास कामाचा लेखाजोखा मांडला. तसेच, गावांमध्ये सध्या भेडसावणाऱ्या रस्ता, वीज, पाणी, शाळा, अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी आणि निवारा शेड, गावांतील बंदिस्त गटारे, मंदिर, सभामंडप अशा विविध समस्या मांडल्या. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी स्वतः प्रत्येक गावाचा आढावा घेतला.
बैठकीत बोलताना आमदार शेळके म्हणाले की, “‘तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून येणाऱ्या काळात प्रत्येक गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार आहोत. तळागाळापर्यंत विकास कामे पोहोचविली जातील.” असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले. तसेच, “तरुण पिढीने व्यवसायावर भर द्यावा. व्यवसायासाठी लागणारे सहकार्य मी करेल” असे मोलाचे आश्वासन आमदार शेळकेंनी तरुणांना दिले. सदर बैठकीमध्ये नागरिकांच्या समस्या समजावून घेत असताना नवीन प्रकल्प, अर्धवट विकासकामे तसेच धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणे अशा अनेक प्रश्नांबाबत आमदार शेळकेंनी नागरिकांसोबत सकारात्मक चर्चा केली.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, महादु कालेकर, नामदेव ठुले, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे, माजी सभापती नंदु धनवे, रविकांत रसाळ, साहेबराव कारके, किशोर सातकर, चंद्रकांत दहिभाते, मारुती काळे, करूंजचे सरपंच सदाशिव शेंडगे, सुवर्णा राऊत, हनुमंत गोणते, माऊली निंबळे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोहोळ यांनी केले. ( MLA Sunil Shelke reviewed development works in various villages of Pavan Maval area )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंनी घेतला पवन मावळमधील पूर्व भागातील गावांच्या विकासकामांचा आढावा; शनिवारी काले इथे बैठक
– शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाची मावळ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठरली रणनिती
– मंडळी! 18001208040 नंबर आताच सेव्ह करा, ‘हे’ दाखले मिळवताना अडचणी आल्यास लगेच फोन करा